कुणबी सेवा चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई ग्रामीण अध्यक्ष संतोष खाडे माणगांव भूषण २०२४ पुरस्काराने सन्मानित
माणगांव- दि. ३० माणगांव शिक्षण प्रसारक मंडळ व अशोक दादा साबळे स्मृती प्रतिष्ठान माणगांव यांच्या संयुक्त विद्यमाने लोकनेते अशोकदादा साबळे यांच्या ८ व्या स्मृती दिननिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. स्मृती दिनानिमित्त विविध कलाक्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांना गौरवण्यात आले. कुणबी सेवा चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई ग्रामीण अध्यक्ष मौजे कळमजे येथील संतोष खाडे यांना माणगांव भूषण २०२४ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. माणगांव शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष ॲड. राजीव साबळे, नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे, सेक्रेटरी कृष्णा गांधी, ॲड. विनोद घायाळ, नगरसेवक सचिन बोंबले, नितीन बामुगडे यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
माणगांव तालुक्यात जिल्हा परिषद शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य, कोरोना काळात मदत, सरकारी दवाखान्यात रुग्णांना मदत, दवाखान्यात बाकडे व पत्रा शेड, किल्ले रायगड स्वच्छता मोहीम, वृद्धाश्रमास सहकार्य, एक हात मदतीचा उपक्रम अशा अनेक उपक्रमातुन त्यांच्या मार्फत समाजसेवेचे कार्य अखंडितपणे गेली अनेक वर्षे सुरू आहे. त्यांच्या या समाजसेवेची वाहवा जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये पसरली असल्याने माणगांव तालुका भूषण या पुरस्काराने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रदीप आडीत, मदन आवाद विनायक उंडरे, भारत उंडरे, मंगेश म्हस्के, अरुण पोवार, सतीश केकाणे, संजय आरसे, सतीश ढेपे, अरविंद मोरे, गणेश भोसले, बाळू जाधव, कुमार जाधव, जय खाडे, राज खाडे, विजय बक्कम, विलास बक्कम, विलास मोरे, जनार्दन वडेकर, मयूर अर्बन, प्रदिप खडतर सर, श्री पोटले, भाई पिंगळे, रोहन पालकर, संस्कार पालकर, पोळेकर, दिलीप उभारे सर, चांदोरकर सर, प्रदिप मुंढे, हरेश खडतर, मंगेश म्हस्के, सुर्वे सर, ओम ढेपे, जाधव गुरुजी, गणेश जाधव, नथुराम वाढवल, प्रशांत हर्नेकर आदि ट्रस्ट बांधव उपस्थित होते.



0 टिप्पण्या