माणगांव बामणोलीरोड अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे बुजवले.
संजय पाटील यांनी मानले नगरसेवक अजित तार्लेकर यांचे आभार.
माणगांव- दि. २१- माणगांव शहर हे मुंबई गोवा महामार्गावर वसलेलं वाहतूकब कोंडी चे शहर म्हणून जवळपास या शहराची ओळख निर्माण होत आहे. त्याला कारणे अनेक आहेत. मात्र,₹ या वाहतूक कोंडीचा अडथळा दूर करण्यासाठी छोटे वाहन धारक अंतर्गत पर्यायी रस्त्यांचा वापर करत असतात. त्यापैकी एक रस्ता म्हणजे माणगाव नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक १२ धील छोटा कालवा एम आर एफ टायर शोरूम पासून बामणोली रोड ते मोर्बा रोड असा जोडणारा अंतर्गत रस्ता. ह्या रस्त्याची अगदी दयनीय अवस्था झाली होती. रस्त्यावर अक्षरशः भले मोठे खड्डे पडले होते. परतीच्या पावसाने हे खड्डे तलावाचे स्वरूप घेत होते. यामुळे या रस्त्यावरून वाहन चालविताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. ह्या महाकाय खड्ड्यामुळे वाहनांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते .याबाबत बामणोली रोड चे रहिवासी सामाजिक कार्यकर्ते संजय होनाजी पाटील यांनी वारंवार स्थानिक नगरसेवक यांच्याकडे तक्रार केली. मात्र नगरसेवकांकडून नवरात्र, दसरा नंतर अशी फक्त आश्वासने मिळत होती .काम मात्र मार्गी लागत नव्हते म्हणजे ह्या रस्त्याला कोणी वाली आहे की नाही?मग आमच्या बामणोली रोड वासीयांना कोणी रस्ता देतो का रस्ता? असा उद्विग्न सवाल संजय पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला होता.त सेच त्याच रस्त्यावरून फिरणारे नगरसेवक साखरझोपेत आहेत का? असा सवाल देखील संजय पाटील यांनी उपस्थित केला होता. तर झोपलेल्या नगरसेवकांना आणि प्रशासनाला जाग यावी आणि बामणोली रोडवासीय व माणगांव कर नागरिक यांची या रस्त्यावरून वाहन चालवताना होणारी कुचंबणा थांबाव. याकरिता या बाबीकडे लक्ष केंद्रित करून लवकरात लवकर उपाययोजना करावी अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते.
यावर या बातमीची दखल घेत प्रभाग क्रमांक १२ चे नगरसेवक यांनी तात्काळ समाजसेवी भूमिका घेत रस्त्याचे काम मार्गी लावले. यामुळे माणगांव बामणोली रोड चे रहिवासी सामाजिक कार्यकर्ते संजय होनाजी पाटील यांनी नगरसेवकांचे आभार मानले आहेत. व नागरिकांच्या तक्रारीची सेवेच्या माध्यमातून दखल घेतली याबाबत धन्यवाद व्यक्त केले आहेत. तसेच नगरसेवक अजित तार्लेकर यांनी नेहमी आणि सदैव प्रभागातील नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर राहावे अशी विनंती देखील संजय पाटील यांनी केली आहे.




0 टिप्पण्या