माणगाव ते किल्ले रायगड दैनंदिन एस टी बससेवा सुरू
आ. भरत गोगावले यांचे विशेष प्रयत्न
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव बसस्थानक ते छत्रपती शिवरायांची हिंदवी स्वराज्याची दुर्गराज किल्ले "रायगड"अशी गरिबांची परी "लालपरी" अशी एस टी बससेवा ३ ऑक्टोबर पासून एस टी महामंडळ अध्यक्ष (मंत्रिपद दर्जा) शिवभक्त आ. भरत गोगावले यांच्या माध्यमातून सुरु करण्यात आली आहे. या बस सेवेचा शुभारंभ युवासेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे यांच्याहस्ते करण्यात आला.नयावेळी माणगाव आगार व्यवस्थापक, माणगाव एस टी कर्मचारी अधिकारी तसेच शिवसेना युवासेना सहकारी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
माणगाव ते दुर्गराज किल्ले रायगड ही एस टी बससेवा दैनंदिन कार्यरत राहील तसेच ह्या बसचे मार्गक्रमण माणगाव ढालघर फाटा स्वराज्य राजधानी किल्ले रायगड प्रवेशद्वार -होडगावं-जांभुळवाडी-ताम्हाणे-पळसगाव-घरोशीवाडी-पुनाडेवाडी-पाचाड-किल्ले रायगड (रोप-वे) असे असणार आहे. अशी कधीही उपलब्ध नसणारी एस टी बस सेवा आ. भरत गोगावले यांच्या प्रयत्नाने सुरू झाल्यामुळे प्रवासी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. आ. गोगावले यांच्यावर कौतुकासाहित अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तर ह्या बस सेवेचा जास्तीत जास्त प्रवासी वर्गानी लाभ घ्यावा असे आवाहन युवासेना जिल्हा प्रमुख विपुल उभारे यांनी केले आहे.



0 टिप्पण्या