इंदापूर विभागात उबाठा गटाला खिंडार

 इंदापूर विभागात उबाठा गटाला खिंडार

निळज सरपंचांसह ग्रामस्थांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव दि. ३- ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर इंदापूर विभागात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाला खिंडार लागला असून राष्ट्रवादी काँग्रेस युवक सचिव तथा ग्रा. पं. भुवन सरपंच दिपक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीचे उमेदवार खा. सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत निळज सरपंचांसह ग्रामस्थांनी दि. ३ मे रोजी अशोकदादा साबळे विधी विद्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला आहे.


 यावेळी ग्रा. पं. निळज सरपंच द्वारकानाथ उभारे, सदस्य अमर कोंडे, अश्विनी अमोल उभारे, माजी सरपंच श्रीराम ढमाले, माजी सदस्या संजीवनी उभारे, तरुण नेतृत्व उदय उभारे, तंटामुक्ती अध्यक्ष महादेव हरी उभारे तसेच बहुसंख्य ग्रामस्थ, महिला मंडळ व तरुण मंडळ यांनी यावेळी पक्ष प्रवेश केला.


यावेळी प्रवेशकर्त्यांनी सांगितले की, आमचं गाव विकासकामांपासून वंचित राहील होत. खा. सुनील तटकरे यांनी संपूर्ण रायगड जिल्ह्यात लावलेला विकासकामांचा धडाका व त्यांची कार्यप्रणाली यावर प्रभावित होऊन पक्ष प्रवेश केल्याचे सांगितले. खा. तटकरेंना लोकसभा निवडणुकीत मतपेटीतून भरभरून मतदान करून मताधिक्य देण्यात येईल. 


यावेळी खा. सुनील तटकरे म्हणाले की, ज्या वेळी माणस विचारसारणीशी जोडली जातात. त्यावेळी ते एकाच प्रवाहात येतात. निळज ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व माझ्यावर दाखविलेला विश्वास नक्कीच सार्थ ठरविला जाईल. यावेळी शिवसेना प्रवक्ते ऍड. राजीव साबळे, माजी नगराध्यक्ष आनंद यादव, रा. कॉ. जेष्ठ नागरिक सेल जिल्हाध्यक्ष शेखर देशमुख, जेष्ठ नेते बाळाराम (काका) नवगणे, माजी सरपंच उदय अधिकारी, उपसरपंच समीर मेहता, तालुकाप्रमुख ऍड. महेंद्र मानकर, राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या