माणगांव मधील साईनगर च्या राजाला भक्तिमय वातावरणात निरोप
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव : दि. २८ -माणगांव मध्ये गेले २१ वर्षाची परंपरा असलेल्या साईनगर मित्रमंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा यावर्षी २०२३ चा "कुंभकर्णाचा निद्राभंग "हा चलचित्र देखावा यावर्षी माणगांवकरांचे खास आकर्षण ठरला आहे.माणगांव मध्ये असलेल्या साईनगर मध्ये माणगांव तालुक्यातील विविध गावे जिल्हा विविध राज्यातील लोकं स्थायिक होऊन गुण्यागोविंदाने नांदत आहेत.आणि विविधतेतून एकता दाखवणाऱ्या या साईनगर मित्र मंडळाने सार्वजनिक गणेशोत्सवाची गेली २१ वर्षाची परंपरा कायम राखली आहे. यावर्षी असणारा चलचित्र देखावा हा धर्मग्रंथ आधारित असला तरी नागरिकांनी त्याचा अद्वैत अर्थ घेऊन दैनंदिन जीवनात त्याचा समजून घ्यावा याचा अर्थ असा की व्यवस्था शासन आणि प्रशासन हे सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या बाबतीत उदासीन (निद्रिस्त) आहे त्या कुंभकर्ण निद्रेचा निद्राभंग होणे गरजेचे आहे ,असा सामाजिक जनजागृती चा संदेश आम्ही या चलचित्रातून देत आहोत असे मत साईनगर गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष शशिकांत मोहिते यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
साईनगर च्या गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाची विसर्जन मिरवणुक यावर्षी ढोल ताशांच्या गजरात लेझीम च्या ठेक्यावर साईनगर चौक ते निजामपूर रोड मुंबई गोवा हायवे ते खांदाड येथील काळ नदी गणेश विसर्जन घाटावर साईनगर च्या राजाला भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला.
साईनगर गणेशोत्सव मंडळाने सन २०२३ यावर्षी अनेक सामाजिक उपक्रम तसेच अनेक मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यामध्ये बुधवार २० सप्टेंबर रोजी मटका फोडणे,२१ सप्टेंबर रोजी पोती उडी,२२ सप्टेंबर रोजी चमचा गोटी,२३ सप्टेंबर रोजी संगीत खुर्ची (मुले ,मुली) २४ सप्टेंबर रोजी सत्यनारायण महापूजा, महिला महाआरती,संगीत भजन,संगीत खुर्ची (महिला) २५ सप्टेंबर रोजी दोरी उड्या,२६ सप्टेंबर रोजी रेकॉर्ड डान्स (लहान गट),२७ सप्टेंबर रोजी रेकॉर्ड डान्स (खुला गट) व बक्षीस वितरण कार्यक्रम असा संपुर्ण कार्यक्रम पडला.
संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी यावर्षी साईनगर गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष शशिकांत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष केदार जाधव, सहसचिव सुबोध सुतार,खजिनदार गणेश दुरकर, सहखजिनदार स्वप्नील झेंडे,व सर्व जेष्ठ सल्लागार ,मार्गदर्शक,व जेष्ठ सभासद यांनी महत्वाची भूमिका बजावली.



0 टिप्पण्या