माणगाव काळ नदीत सापडली डेड बॉडी; पुलावर झाली बघ्यांची एकच गर्दी

 माणगाव काळ नदीत सापडली डेड बॉडी; पुलावर झाली बघ्यांची एकच गर्दी

साळुंके रेस्क्यू टीम व पोलिसांच्या मदतीने काढली डेड बॉडी बाहेर

माणगाव : दि. २९ - माणगाव शहरातील काळ नदीमध्ये अंदाजे ४० वय वर्ष असलेल्या इसमाची डेड बॉडी सापडली आहे.

   सविस्तर वृत्त असे की, माणगाव पोलिसांना काळ नदी मधून एक डेड बॉडी वाहत असल्याची बातमी मिळाली. माहिती मिळतात साळुंके रेस्क्यू टीम व माणगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. साळुंखे रेस्क्यू टीम च्या साह्याने काळ नदीपात्रात अवघ्या काही वेळातच ही डेड बॉडी बाहेर काढण्यात आली. 

ही डेड बॉडी माणगाव येथील राहुल मोरे यांची असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. हे रेस्क्यू कार्य सुरू असताना मात्र काळ नदी पुलावर बघ्याची एकच गर्दी जमली होती. जो तो आपली वाहने बाजूला लावून बघत होता. त्यामुळे पुलावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. नक्की हा प्रकार काय घडला असावा याचा पुढील तपास माणगांव पोलीस करीत आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या