आर पी आय (A) गटाचे महाराष्ट्र. राज्य उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या कराड दौऱ्यादरम्यान विशेष उपक्रम

 आर पी आय (A) गटाचे महाराष्ट्र. राज्य उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या कराड दौऱ्यादरम्यान विशेष उपक्रम

पोलीस प्रवाह न्यूज

सातारा-दि.- २०- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांनी राज्यात महिलांवर होणाऱ्या वाढत्या अन्यायामुळे राज्यात विविध जिल्ह्यात मिटिंग घेऊन आंदोलन करणेबाबत आदेशीत केल्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तथा सातारा जिल्हा अध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांचा दि. १८ ऑगस्ट रोजी कराड दौरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कराड येथे शासकीय विश्रामग्रह मध्ये मिटिंग घेण्यात आली. सदरच्या मिटिंग मध्ये जिल्हा अध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ म्हणाले कि, महाराष्ट्रामध्ये महिलांवर अत्त्याचार वाढत आहे. आता रिपब्लिकन पक्ष गप्प बसणार नाही. जोपर्यंत अन्याय झालेल्या महिलांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहणार. मिटिंगमध्ये आंदोलनाच्या सूचना दिल्या गेल्या. सदर मिटिंग मध्ये पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष सुरेश पवार, युवक जिल्हाअध्यक्ष सोमनाथ तात्या धोत्रे, युवक जिल्हा उपाध्यक्ष राज चव्हाण, उ. युवक जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय पवार, कराड तालुका अध्यक्ष मुकुंद माने, खटाव तालुका अध्यक्ष सागर भिलारे (डॅडी), खटाव तालुका गटनेते अतुल घोणे, कराड दक्षिणचे अध्यक्ष सर्जेराव बनसोडे, राजू ओव्हाळ सुनील ओव्हाळ, बकाशा जाधव प्रशांत भोंडवे आदी उपस्थित होते.

आर पी आय  जिल्हाध्यक्ष कराड दौऱ्यावर असताना विशेष उपक्रम राबविण्यात आले. शासकीय विश्रामगृहमधील मिटिंग संपताच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) चे जिल्हा अध्यक्ष  दादासाहेब ओव्हाळ यांनी यशवंतराव चव्हाण लॉ कॉलेज ला भेट दिली. व लॉ कॉलेज  मधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याच वेळी लॉ कॉलेजचे प्राचार्य यांचा जाहीर सत्कार रिपाई (A)च्या वतीने करण्यात आला. 

तसेच डॉ. द. शी. अपंग सहाय सं्थेचे मुकबधीर विद्यालय कराड येथे मुकबधीर मुलांना फळे वाटप करण्यात आले. त्यावेळी मूकबधिर विद्यालयाच्या प्राचार्या अश्विनी हनमसागर, शिक्षिका संगीता यादव, पद्मिनी बनसोडे सर्व शिक्षक वर्ग व रिपब्लिकन पार्टी आंबेडकर गटाचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थितीत होते. या कार्यक्रमप्रसंगी आर पी आय जिल्हा अध्यक्ष म्हणाले की, आपल्या शाळेला कोणतीही अडचण आल्यास रिपब्लिकन पक्ष आपल्याला मदत करण्यास नेहमी तत्पर राहील. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक बाबासाहेब पाटील यांनी केले तर, प्राचार्य अश्विनी हनमसागर यांनी जिल्हा अध्यक्ष यांना पुष्पगुच्छ देऊन सर्व उपस्थितांचे आभार मानले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या