जेष्ठ पत्रकार अरुण पोवार रायगड जिल्हा आदिवासी मित्र पुरस्कारानी सन्मानित
माणगांव-दि. १०- माणगांव तालुका पत्रकार सेवा संघाचे संस्थापक,लोकनेते अशोक दादा साबळे पतसंस्था चे चेअरमन, गुरुमाउली ग्रुपचे अध्यक्ष व शिवसेना नेते ऍड राजीव साबळे यांचे खंदे समर्थक रायगड भूषण जेष्ठ पत्रकार अरुण पोवार यांना दि. ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनी रायगड जिल्हा एकलव्य आदिवासी सामाजिक सेवा संस्था यांच्याकडून रायगड जिल्हा आदिवासी मित्र पुरस्काराने आदिवासी बांधवांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारामध्ये शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह असे पुरस्कार स्वरूप आहे.
पत्रकार अरुण पोवार यांनी आदिवासी समाजाच्या अनेक समस्यांच्या न्याय हाक्कासाठी आपल्या धारधार लेखणीतून जनजागृती करून आदिवासी समाजाच्या अनेक समस्या साठी शासन दरबारी आवज उठवून न्याय दिला आहे. तसेच आदिवासी समाज जनजागृती, आदिवासी धर्मांतर रोखण्यासाठी भरीव प्रयत्न केले.
आदिवासी समस्या सोडविण्यासाठी वर्तमान पत्रातून आवाज उठविला. त्यांच्या कार्याची टाइम्स ऑफ इंडिया कडून दखल घेऊन वर्तमानपत्रात मुलाखत घेण्यात आली होती. ती गुगलवर प्रसिद्ध २००५ साली प्रसिद्ध सुद्धा झालेली आहे. आदिवासी पाडे, आदिवासी वाड्या या ठिकाणी आदिवासी बांधवांसाठी अनेक पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेतल्या व कार्यरत देखील केल्या. सामाजिक सुधारणा तसेच अनेक नागरी समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले. तसेच त्यांनी शेकडो विध्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांचे शिक्षण पूर्ण केले. त्या कामाप्रती त्यांना हा रायगड जिल्हा आदिवासी मित्र पुरस्कार देण्यात आला. कुणबी भवन माणगांव येथे झालेल्या कार्यक्रमात आदिवासी समाज बांधव संघटनेचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष भिवा पवार, जिल्हा उपाध्यक्ष महादेव कोळी, जिल्हा सचिव राम कोळी, जिल्हा खजिनदार जगन मुकणे, सहखजिनदार धर्मराज कोळी, जिल्हा संघटक त्रिभुवन पवार हे उपस्थित होते. तर अरुण पोवार यांना आदिवासी मित्र पुरस्कार प्रदान करताना माणगांवचे माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर उभारे, माणगाव नगरपंचायत प्रभाग क्रमांक १ च्या उतेखोल आदिवासी वाडी व नाणोरे आदिवासीवाडी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका लक्ष्मी जाधव,बतारा कोळी, इंदू पवार, मारुती पवार, सर्व विकास दीप संस्थेचे महेश मोरे व रायगड जिल्ह्यातील विविध विभागातील व माणगाव तालुक्यातील विविध विभागातील आदिवासी समाज बांधव व भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हाध्यक्ष भिवा पवार यांनी केले तर कार्यक्रमास माणगांव तालुक्यात जेष्ठ आरोग्य सेवा कर्मचारी वामन काटकर हे देखील उपस्थित होते.



0 टिप्पण्या