माणगावात कुणबी समाजाचा मेळावा विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा

 माणगावात कुणबी समाजाचा मेळावा विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा


पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव-दि. ८- माणगाव शहर कुणबी समाज संघटना यांच्या विद्यमाने  "कुणबी समाज स्नेहमेळावा" शुक्रवार दि. ७ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता माणगाव नगरीचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांच्या अध्यक्षतेखाली व माणगाव तालुका कुणबी समाज विकास मंडळाचे अध्यक्ष महादेवराव बक्कम यांच्या प्रमुख उपस्थितीत  कुणबी भवन माणगाव याठिकाणी विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा  करण्यात आला.

सदर मेळाव्यास माणगाव तालुका कुणबी समाज मंडळाचे खजिनदार रामभाऊ टेंबेसचिव शांताराम भोरावकरकुणबी सेवा चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई अध्यक्ष निलेश सत्वेमाणगाव पंचायत समितीच्या माजी सभापती संगीता बक्कम,  माणगाव नगरीचे माजी नगरसेवक नितीन बामगुडेमाजी उपनगराध्यक्ष रत्नाकर उभारे,  माजी उपनगराध्यक्ष संदीप खरंगटेसुधाकर पालकरशंकर शिंदे गुरुजीशांताराम खाडे महाराजशिक्षिका अपूर्वा जंगमसाले ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संजय बक्कम आदी मान्यवरांसह कुणबी समाज बांधव-भगिनी मोठया संख्येने उपस्थित होते.

या स्नेह मेळाव्यात बळीराम चव्हाण सर यांचे गीतमंच, विवा कॉलेजचे विविध कलागुणदर्शन व नाटकमाणगाव येथील काजल डान्स अकॅडमीतर्फे विविध डान्स असे कार्यक्रम सादर करण्यात येऊन समाज बांधवांचे मनोरंजन करण्यात आले. यावेळी विविध कार्यक्रम सादर करणाऱ्यांचा  आयोजकांतर्फे प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या स्नेह मेळाव्याचे सूत्रसंचालन मनीषा चव्हाण यांनी तर आभार प्रदर्शन अजित शेडगे गुरुजी यांनी केले.

 सदर स्नेह मेळावा यशस्वीपणे साजरा करण्यासाठी माणगाव शहर कुणबी समाज संघटनेचे  अध्यक्ष संतोष मालोरेउपाध्यक्ष बळीराम चव्हाणसचिव सीताराम भोनकरकार्याध्यक्ष अनिल अंबावलेखजिनदार भालचंद्र खाडेसमन्वयक संदेश नाडकरसहखजिनदार विश्वास मरवडेसहसचिव हनुमंत चिंचाळकरप्रसिद्धी प्रमुख अजित शेडगेरुपेश वाढवळसद्स्य विठोबा शिंदेदिनेश खडतरअनंत दळवी,सतिष ढेपेनंदकुमार जाधवभारत  वाढवळयोगेश खडतरविजय शिंदेनितीन डवलेविवेक ढेपेसल्लागार कृष्णा पानवकरप्रकाश खिडबिडेजनार्दन वडेकरदामोदर शिंदेशंकर शिंदेसतिष केकाणेशंकर उभारेसखाराम सत्वेसुनील बुटेनितीन खडतर,नितीन उभारे व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेऊन स्नेह मेळावा उत्साहात साजरा केला.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या