इर्टीगा कारची स्कुटीला मागून ठोकर; एक गंभीर जखमी

 इर्टीगा कारची स्कुटीला मागून ठोकर; एक गंभीर जखमी

पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव-दि. १९- माणगांव तालुक्यात अपघाताचे सत्र सुरूच आहे. इर्टीगा कारची स्कुटीला मागून ठोकर लागून अपघात होऊन एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. 

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तरपणे असे की, दि. १९ एप्रिल रोजी सकाळी ८ वा. च्या सुमारास राजेश लक्ष्मण गुगले रा. निळगुण, ता. माणगांव हा त्याच्या ताब्यातील ऍक्टिवा स्कुटी क्र. एम एच ०६ बी एन ७७३६ ही माणगांव मोर्बा रोडने स्वतः चालवित घेऊन जात असताना मौजे निळगुण गावच्या हद्दीत एच पी पेट्रोल पपंसमोर आल्यावेळी मागून माणगांव बाजूकडून मोर्बा बाजूकडे जाणारी राखाडी रंगाची इर्टीगा क्र. एम एच ४६ बी ए ४६०१ वरील आरोपी अब्दुल जब्बार अब्दुल हमीद तालसुलकर, रा. दहिवली याने कार हयगयीने, बेदरकारपणे, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून स्कुटीला मागून ठोकर मारून अपघात केला. या अपघातात स्कुटी चालक गंभीर जखमी झाला असून दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले आहे.

या अपघाताची नोंद माणगांव पोलीस ठाणे येथे कॉ. गु. र. नं. १२२/२०२३ भा. दं. वि. सं. क. २७९, ३३७, ३३८, मो. वा. का. अधिनियम १८४ प्रमाणे करण्यात आली असून पुढील तपास पो. नि. राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. फौज. मगर करीत आहेत.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या