निजामपूर येथे छोटा मोहल्ला येथील मोहम्मदिया चौकाचे अनावरण

 निजामपूर येथे छोटा मोहल्ला येथील मोहम्मदिया चौकाचे अनावरण

पोलीस प्रवाह न्यूज 

माणगांव-दि. १२- निजामपूर छोटा मोहल्ला येथे दि. १० फेब्रुवारी रोजी रात्री मोहम्मदिया चौकाचे अनावरण निजामपूर सरपंच राजाभाऊ रणपिसे, राष्ट्रवादी काँग्रेस महाड माणगांव पोलादपूर विधानसभा अध्यक्ष चंद्रशेखर उर्फ बाबूशेठ खानविलकर, सुधीर  पवार. रहीमत परदेशी यांच्या हस्ते पार पडले.


या वर्षी पहिल्यांदा कव्वालीचं जंगी आयोजन करण्यात आले होते. त्या साठी मशहूर कव्वाल मुराद अतिश हे या कव्वालीचे आकर्षण होते. यावेळी नितिन बडे, राजेश कदम, छोटा मोहल्ला अध्यक्ष इलियाझ  सांगले, इरफान परदेशी, मुश्ताक अखवारे, जिक्रिया परदेशी, शब्बीर अखवारे, रहीमत परदेशी, मोठा मोहल्ला अध्यक्ष इस्माईल लोखंडे ई. मान्यवर उपस्थित होते.

कव्वालीचा कार्यक्रम पाहण्यासाठी हिंदू बांधव तसेच मोर्बा, साई, दहिवली, गोरेगाव, माणगाव, नागोठणे, रोहा, तळा, माजरोणे, टेमपाले येथील श्रोत्यांनी हजेरी लावली होती.  हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी फवाद परदेशी, जमील परदेशी, अब्दूलभाई परदेशी, नजीर परदेशी, मन्सूर परदेशी, जुनेद परदेशी, अखलाक अखवारे, ताबिश परदेशी, असिफ परदेशी, मैनुदिन परदेशी, इम्रान परदेशी, शकील लोखंडे, अशरफ लोखंडे, माजिद सांगले. अरबाज सांगले, जुनेद मांडलेकर, हुसेन मांडलेकर, अमीर खान यांनी विशेष मेहनत घेतली.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या