सेवानिवृत पोलीस संघटना एकत्र येऊन शिखर संस्थेची स्थापना

 पोलिसांच्या न्याय प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यातील सेवानिवृत पोलीस संघटना एकत्र येऊन शिखर संस्थेची स्थापना

पोलीस प्रवाह न्यूज 

  दि 10/ 2/ 2023 रोजी  हॉटेल संदीप चंदन नगर ,पुणे 14  येथे स 11ते दु 5 या वेळात  महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्याभरातील सेवानिवृत्त पोलीस संघटनांची महा बैठक आयोजित करण्यात आली होती.

राज्यात सध्या सेवानिवृत्त पोलीस बांधवांच्या विखुरलेल्या संस्थाचे एकत्रिकरण करून पोलिसांचे विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी राज्य पातळीवर मध्यवर्ती शिखर संस्थेची स्थापना करण्याचे  नियोजन अनेक दिवसापासून चालू होते.आणि यासाठी  पुणे येथील सेवानिवृत्त पोलीस बांधव संस्थेचे अध्यक्ष  श्री संपतराव जाधव,  कार्याध्यक्ष श्री महादेव पवार मुंबईचे मोहन राव तोडकर ,रायगडचे  अध्यक्ष श्री राजेंद्र  कासार   हे प्रयत्नशील होते.

 आज पुणे येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात, महाराष्ट्रातील पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद ,मुंबई, रायगड, जळगाव ,नंदुरबार, भंडारा, यवतमाळ, गोंदिया, नाशिक,मुंबई रेल्वे, कारागृह,पुणे ग्रामीण अशा जिल्ह्यांचे  पदाधिकारी दूरहून आले होते.  


 सेवानिवृत्त पोलीस  कल्याणकारी शिखर संस्था. कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य. या संस्थेची स्थापना करण्यात आली.

शिखर संस्थेचे अध्यक्ष श्री  संपतराव जाधव व कार्याध्यक्ष  श्रीमोहन  तोडकर , महासचिव म्हणून श्री महादेव पवार, व विविध जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बहुमताने निवड करण्यात आली. 

 याप्रसंगी  बोलताना संस्थेचे अध्यक्ष श्री संपतराव जाधव संस्थेचे महासचिव  श्री महादेवराव पवार. व मुबंई अध्यक्ष मोहन तोडकर तसेच आलेल्या इतर जिल्हाध्यक्ष यांनी   सेवानिवृत्ती नंतर येणाऱ्या  अडचणीबाबत शिखर परिषदेमध्ये संवाद साधला.

  पोलिसांना सेवानिवृत्तिनंतर मोफत वैद्यकीय सुविधा टोलमाफी ,जुलै महिन्याचि वेतनवाढ,निवृत्तीनंतर  देय लाभ  वेळेवर मिळाले पाहिजेत,तिन आश्वासित योजनेअंतर्गत 30 वर्षानंतर psi  पदावर पदोन्नति ,पदोन्नतीचे प्रलंबित प्रश्न,पोलिस मतदार संघ , पोलिस भरतीत पोलिसांच्या मुलांना 25 टक्के आरक्षण. राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित व्यक्किचे सवलतित वाढ  करणे.उत्कृष्ट कामासाठी मिळालेली वेतन वाढ ,बंद केल्यामुळे ती परत चालू करणे.  या सह अनेक प्रश्नासाठी वेळोवेळि विविध संघटनानि  शासनास पत्रव्यवहार करून भेटिचि वेळ मागितलि होती परंतु शासनाकडून अध्याप कोणताही प्रतिसाद मिळाला नाही  .

आपल्या न्याय  मागण्यांचा विचार शासनाने मान्य केल्याच  पाहिजेत व आपल्याला भेटीसाठी बोलावलेच पाहिजे यासाठी सर्व संघटनानी एकत्र येऊन शिखर संस्था स्थापनेवर घेतलेला  निर्णय अमलात येऊन राज्य पातळीवर, सेवानिवृत्त पोलिसांचे एक भव्य संघटन, शिखर संस्थेच्या रूपाने  उभे करण्यात आलेले आहे.

सर्व जिल्ह्यातील पोलिसांच्या अशा विविध प्रश्नांचे वर अनेकदा निवेदने देऊनही शासनाकडून कोणतीही कार्यवाही होत नाही. यासाठीआंदोलनात्मक कार्यक्रमाचे नियोजन करणेबाबत मनोदय व्यक्त करण्यात आला. शिखर संस्थेचे स्थापनेच कार्यवाहीमध्ये  कार्यकारीनी मंडळाची  सर्वानुमते निवड करण्यात आली.

 संस्थेच्या कार्यकारणीवर पुढील प्रमाणे कार्यकारी मंडळ निवडण्यात आलेले आहे.

 संपतराव जाधव -अध्यक्ष. ,महादेव पवार - महासचिव ,मोहन तोडकर -कार्याध्यक्ष , पंढरीनाथ मांढरे- उपाध्यक्ष, मच्छिंद्र कांगणे -उपाध्यक्ष, मोतीलाल ठाकूर- उपाध्यक्ष, शरद बोंगाळे -खजिनदार, नंदकुमार शेलार- सहसचिव, राजेंद्र सरवदे- सह खजिनदार, सौ.मीनाक्षी पेठे- सल्लागार,  राजेंद्र कासार- सह सल्लागार, सुभाष- तोडकर प्रसिद्ध प्रमुख, भैयालाल ठाकरे -सह प्रसिद्धीप्रमुख, विष्णू पवार- उपाध्यक्ष,खंडेराव गांधले उपाध्यक्ष,  ओंकार प्रसाद श्रीवास- उपाध्यक्ष, सूर्यकांत चव्हाण सदस्य, जगन्नाथ जगदाळे -सदस्य, सखाहरि शेळके -सल्लागार सदस्य,   विजय जाधव- सह संपर्कप्रमुख ,संतोष  गजभिव सदस्य.

 अशाप्रकारे  मुख्य कार्य कारणीची निवड करण्यात आलेली आहे.महाराष्ट्र राज्यातील आपल्या सर्व मित्र संघटना, पदाधिकारी आणि  सेवानिवृत्त सदस्य  अशा सर्वांनी आपली ही शिखर संस्था उभी करण्यासाठी  मोलाचे बहुमोल सहकार्य  केलेले आहे.

 शिखर  संस्थेच्या स्थापने साठी आलेल्या प्रतिनिधींनी, सेवानिवृत्त पोलिसांच्या कल्याणकारी बाबीवर. करावयाची  पुढील वाटचाल, व त्यांच्या मनोगतातून प्रतीत होत असलेला जोष, यातून, आजची बैठक  व सर्व सभा भारावून गेली होती.

 शिखर संस्था स्थापन करण्यासाठी,महाराष्ट्रातील, आमच्या सर्व मित्र संघटनांच्या  सर्व सदस्यांना पाचारण करता आले नाही. कारण पोलीस भरती मुळे  पुणे येथील पोलीस मुख्यालयाच्या  भव्य हॉलमध्ये कार्यक्रमाचे नियोजन करता न आल्याने  अन्य ठिकाणी  स्वतंत्र हॉल घेऊन नियोजन करावे लागले. कार्यक्षेत्रांतर्गत  राज्य पातळीवर आपला भव्य मेळावा होणारच आहे.

 त्यावेळी  महाराष्ट्रातील सर्व सेवा निवृत्त सदस्यांच्या अडीअडचणीवर चर्चा होऊन पुढील कार्यवाही नियोजित आहे. शिखर संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व सदस्य आपल्या प्रत्येक सेवानिवृत्तांच्या भेटीसाठी आतुर आहेत.

 आजच्या कार्यकारणीवर  निवडण्यात आलेल्या कार्यकारी मंडळाच्या  प्रतिनिधींनी आप  आपल्या जिल्ह्यातील  सर्व सेवा निवृत्त सदस्यांना  आपल्या शिखर संस्थेच्या स्थापनेची, योजनाची, आणि पुढील नियोजनात्मक कार्यक्रमाची  माहिती द्यावी आणि महाराष्ट्रातील सर्व सेवानिवृत्त पोलीस बांधव शिखर संस्थेशी जोडले जावेतही सर्वांचीच मनोमन ईच्छा आहे. संस्थेच्या  कार्यकारिणीवर निवड झालेल्यास र्व पदाधिकाऱ्यांचे  अभिनंदन व आभार तसेच या मिटींग यशस्वी होण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी यांच्या बरोबर पुणे येथील संघटनेचे उपाध्यक्ष श्री श्रीरंग लंघे, सचिव श्री सुरेश शेळके, सदस्य खजिनदार श्री मच्छिंद्र कुंभार, क्रियाशील पदाधिकारी श्रि फत्तेसिंग   गायकवाड, नाशिक अध्यक्ष श्री निकम,कारागृह अध्यक्ष श्री गुंजाळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  शरद पवार तर कार्यक्रमाचे आभार श्री सदाशिव भगत यांनी केले. 

 


         

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या