आदर्श शाळा तळाशेतचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

 आदर्श शाळा तळाशेतचे  वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

पोलीस प्रवाह न्यूज

इंदापूर-दि. ३०- रा. जि. प. आदर्श शाळा तळाशेतचे  वार्षिक स्नेहसंमेलन  शनिवार दिनांक २८ जानेवारी रोजी शाळेच्या पटांगणात मोठ्या उत्साहात संपन्न झाले.  मा. जि. प. स. स्वाती नवगणे, दक्षिण रायगड शिवसेना प्रमुख अनिल  नवगणे, तळाशेत ग्रामपंचायत सरपंच रोशनी नवगणे, उपसरपंच  समीर मेहता आदींसह अनेक मान्यवरांच्या शुभहस्ते फीत कापुन शिव प्रतिमेचे पुजन करुन दीपप्रज्वलन आणि रंगमंचाचे पुजन करण्यात आले.

यावेळी  मान्यवरांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेले 'शब्द मोहोर' या हस्तलिखिताचे प्रकाशन  करण्यात आले.  त्याचबरोबर  शाळेचा सन २०२२-२३ चा आदर्श विद्यार्थी पुरस्कार कु. श्रेयश ढाकणे व कु. ईश्वरी सहस्त्रबुद्धे या विद्यार्थ्यांना देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.  बालचमुंनी विविध कलागुण यामध्ये शेतकरी नृत्य, लावणी नृत्य, देशभक्तीपर गीते, भक्ती गीते, स्वच्छता संदेश, नाटक असे विविध कलाविष्कार सादर करुन प्रेक्षकांची वाहवा मिळवली. 


यावेळी केंद्रप्रमुख  गणेश ढेपे, ग्रामपंचायत सदस्य  नितीन घोणे, अमोल पाटील,  प्रमोद मिरजकर,  शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेश संसारे, उपाध्यक्षा अस्मिता बांदल सर्व सदस्य , शिक्षणप्रेमी आकाश वाणी, निलेश नवगणे आदींसह तालुक्याच्या कानाकोपऱ्यातील शिक्षकवर्ग, ग्रामस्थ व  महिलावर्ग बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन  गणेश ढेपे व कोळी सर यांनी केले. तर आभार प्रदर्शन भिंगारे मॅडम  यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धोत्रे सर, सुरवसे  सर, साटम सर, बारटक्के मॅडम, महाले मॅडम यांसह शाळा व्यवस्थापन समिती सदस्या यांनी मोलाचे योगदान दिले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या