‘हात से हात जोडो' अभियान प्रभावी राबविणार !
म. गांधीजींची पुण्यतिथी दिनी कॉंग्रेस जिल्हा उपाध्यक्ष पंकज तांबे यांचे प्रतिपादन.
पोलीस प्रवाह न्यूज
माणगाव- दि. ३०- महात्मा गांधीजींची पुण्यतिथी माणगाव येथील राष्ट्रीय कॉंग्रेस कार्यालयात कॉंग्रेस पक्षाच्या वतीने साजरी करण्यात आली. यावेळी हात से हात जोडो अभियान माणगाव तालुक्यासह रायगड जिल्ह्यात प्रभावी राबविणार असल्याचे प्रतिपादन कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष पंकज तांबे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. यावेळी कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विलास सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी करण्यात आली. यावेळी तालुक्यातील विविध पदाधिकारी मोठ्या संख्यने उपस्थित होते.
माणगाव येथील राष्ट्रीय कॉंग्रेस कार्यालयात महात्मा गांधीजींची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी कॉंग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष पंकज तांबे यांनी म. गाधीजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यावेळी व्यासपीठावर तालुकाध्यक्ष विलास सुर्वे, निजामपूर विभागीय अध्यक्ष स्वप्निल शिर्के, गोरेगाव विभागीय अध्यक्ष सर्फराज उमलकर, तालुका कार्यकारणी सदस्य महेश जाधव, सुरेश मुंढे, सामाजिक कार्यकर्ते अनिता महाडिक, कैलास वाघमारे, मारुती पवार, संभाजी गायकवाड, सुबोध गंभीर, गुलाम सरखोत, संजय जाधव, बबन जाधव, राम जाधव, सुनील जाधव, कृष्णा जंगम, मंगेश पवार, चंद्रकांत जाधव, राजू पवार यांच्या सह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी पंकज तांबे यांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले की, महात्मा गांधीजीची पुण्यतिथी संपूर्ण देश भरातून साजरी होत असल्याचे सांगत म्हणाले की, म. गांधीजींनी केलेला त्याग व त्यांचे देशासाठीचे योगदान महत्त्वाचे आहे. अशा थोर पुरुषाच्या पुण्यतिथी दिनापासून कॉंग्रेस पक्षाने हात से हात जोडो अभियान राबविण्याचा संकल्प केला असून हे अभियान माणगाव तालुक्यात प्रभावी राबवून जास्तीत जास्त सभासद नोंदणी चालू वर्षात करण्याचा मानस व्यक्त केला. यावेळी तालुकाध्यक्ष विलास सुर्वे यांनी गांधी घराण्याचे देशासाठीचे योगदान किती महत्वाचे आहे. याचे विविध उदाहरणे देत कॉंग्रेस पक्ष बळकटी करू असा निर्धार केला.



0 टिप्पण्या