श्री स्वयंभू गणपती मंदिर मुगवली येथे 'श्री गणेश जन्मोत्सव' सोहळा.
माघी गणेश जन्मोत्सव निम्मिताने मुगवली गावाला यात्रेचे स्वरूप.
माणगांव-दि.२५- 'श्री गणेश जन्मोत्सव' हा कोकणात दरवर्षी साजरा केला जातो. यावेळी विविध कार्यक्रम, जत्रोत्सव व जल्लोषामय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. कोकणात अनेक गणपती देवस्थाने आहेत. त्यातील एक 'स्वयंभू गणपती मंदिर मुगवली' हे आहे.
माणगांव तालुक्यातील मुंबई गोवा हायवे लगत मुगवली येथे असलेल्या स्वयंभू गणपती मंदिरात श्री गणेश जन्मोत्सव सोहळा दि. २५ जानेवारी रोजी साजरा करण्यात आला. या वेळी सकाळी ७ ते ९ श्री मूर्ती महापूजा अभिषेक, ११ वा. गणेश जन्मोत्सव व किर्तन भूषण ह. भ. प ज्ञानेश्वर मुरलीधर कपलाने यांचे किर्तन तसेच १२.३९ वा. श्री गणेश जन्म दुपारी १ वा. भजन व दुपारी २ वा. श्री गणेश यागारंभ व सायंकाळी ७.३० वा यागपूर्णाहुती, रात्री १२.३० वा महानैवैद्य, आरती व प्रसाद असे कार्यक्रमांचे व यात्रेचे आयोजन विश्वस्त व ग्रामस्थ मंडळाकडून करण्यात आले होते.
धार्मिक समारंभ कोविड १९ चे प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र शासन, स्थानिक प्रशासनाचे नियम व अटींचे पालन करून भक्तिमय वातावरणात शिस्तबद्ध पद्धतीने हा उत्सव साजरा करण्यात येत असल्याचे व्यवस्थापक मंडळाने सांगितले. श्री स्वयंभू गणपती मंदिर मुगवली हे माणगांवकरांचे श्रद्धास्थान असल्याने माणगावकरांसह अनेक भक्तांनी येथे देव दर्शनासाठी मोठ्या प्रमाणत हजेरी लावली होती .
मुगवली येथील श्री गणपतीची महती सांगण्यात येते की,
रायगडमध्ये माणगाव तालुक्यात मुगवली येथे स्वयंभू गणपती म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे. दक्षिण रायगड जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव पासून तीन किलोमीटर अंतरावरील मुगवली फाट्या पासून अवघ्या दहा मिनिटाच्या अंतरावर मुगवली गावाला लगत हे मंदिर आहे. हे मुगवली गाव शंभर-दीडशे घरांचे छोटे गाव आहे. लोकसंख्या ६०० ते ७०० आहे. कॅनलला लागूनच हे गाव आहे. मोठ्या प्रमाणात शेती सुद्धा या गावात केली जाते. या गावाला कॅनल आणि शेतीमुळे एक वेगळेच सौंदर्य रूप प्राप्त झालेला आहे. या मंदिरामुळे या गावाची शोभा मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.







0 टिप्पण्या