माणगावमध्ये रायगड जिल्हा पोलीस पाटील संघाचा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न.

 माणगावमध्ये रायगड जिल्हा पोलीस पाटील संघाचा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न.

पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव-दि. २४- पोलीस पाटील म्हटले की, गाव (जनता) व पोलीस प्रशासन यामधील दुवा. गावच्या विकासात सरपंच एवढीच महत्वाची भूमिका पोलीस पाटीलांची असते. गावात घडलेला गुन्हा असो किंवा किंवा एखादी सुखद दुःखद घटना यावेळी पोलीस पाटीलच प्रशासनाशी समनव्यय साधत असतो.

अशाच प्रकारे रायगड जिल्ह्यात पोलीस पाटील संघ कार्यरत आहे. या पोलीस पाटील संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन दि. २३ जानेवारी रोजी माणगाव तहसील कार्यालय येथे  तहसीलदार प्रियांका आयरे कांबळे यांच्या हस्ते, तसेच माणगाव पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील व पोसई सतिष आस्वर यांच्या हस्ते व गोरेगाव पोलीस ठाणे येथे ए.पी.आय श्रीकृष्ण नावले या  मान्यवरांच्या शुभहस्ते  सोहळा वरील तिन्ही ठिकाणी संपन्न झाला.

तीनही  मान्यवरांनी पोलीस  पाटील राबवित असलेल्या नवनवीन उपक्रमांना शुभेच्छा देऊन कौतुक केले. सदर प्रसंगी रायगड जिल्हा पो. पा. संघाचे  कार्याध्यक्ष चंद्रकांत चेरफळे रायगड जिल्हा महिला प्रसिध्दी प्रमुख  सानवी चव्हाण, तालुकाध्यक्ष जलील फिरफिरे, मनोहर धुमाळ, गोरेगाव खजिनदार समीर मुरुडकर, रश्मी खराडे तसेच बाळाराम पवार, शरद मोरे, प्रकाश गायकवाड, हरीचंद्र साळवी, यशवंत पानवकर व अन्य पोलीस पाटील उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या