साके येथे दत्त जयंती निमित्त दिंडी सोहळा.
पोलीस प्रवाह न्यूज
कोल्हापूर : दि.७ - साके ता.कागल येथील श्री दत्त प्रासादिक संगीत सोंगी भजन आयोजित दत्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन दिंडी सोहळ्यास मोठा प्रतिसाद मिळाला.दररोज नित्य नियमाने गुरुचरित्र सकाळी पारायण नंतर आरती त्यानंतर रात्री परिसरातील भजनी मंडळाकडून भजन सेवा केली जात होती तर दत्त जयंतीनिमित्त निमित्ताने दिंडी सोहळा देखील आयोजित केला गेला त्यामध्ये टाळ मृदंगाच्या गजरात अभंग व "दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा" चा जयघोष करत दिंडी संपुर्ण गाव प्रदक्षिणा घेत श्रीदत्त मंदिर येऊन भजनाने सांगता करण्यात आली.
या वेळी सुधाकर पोवार,बाळासो पाटील,अशोक सातुसे,संजय सुतार,पांडुरंग पाटील,संजय निऊंगरे,संतोष ससे,दगडू सुतार,निवृत्ती पाटील,अभिजित वाईगडे .इ वारकरी ग्रामस्थ पारंपरिक पोशाखात तर महिला डोक्यावर घागर घेऊन सहभागी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असुन शुक्रवार ०९ डिसेंबर रोजी सकाळी महाप्रसाद व रात्री श्री विठ्ठलपंती सोंगी भजन दुर्गुळवाडी सोंगी भजनाचा कार्यक्रम असुन भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.



0 टिप्पण्या