घरफोडी मधुन चोरीला गेलेले दागिने गोरेगाव पोलीस ठाण्याकडून मालकाला सुपूर्द

 घरफोडी मधुन चोरीला गेलेले दागिने गोरेगाव पोलीस ठाण्याकडून मालकाला सुपूर्द

पोलीस प्रवाह न्यूज 

माणगाव-दि. १३ -गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीत दि. ३१ जानेवारी २०२१ रोजी रात्री १२:३० वा. ते ०४ मार्च २०२१ रोजी सकाळी ७:०० वाजण्याच्या सुमारास मौजे दहिवली कोंड ता. माणगाव जि. रायगड येथे इनायतुल्ला बंदरकर यांच्या घरी घरफोडी झाली होती. सदर गुन्ह्याची नोंद दि.०६ मार्च २०२१ रोजी रात्री १२:४० वा. गोरेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.

सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व गोरेगाव पोलीस ठाणे यांनी संयुक्तरीत्या गुन्ह्याची उकल करून ३ आरोपींच्या मुस्क्या आवळून त्यांच्याकडून २७३ ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने रू.९४३००० किमतीचा मुद्दे माल हस्तगत केला होता. हस्तगत केलेला मुद्देमाल दि.१२ डिसेंबर २०२२ रोजी मा. उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांच्या हस्ते स.पो. निरीक्षक श्रीकृष्ण नावले गोरेगाव पोलीस ठाणे यांनी इनायतुल्ला बंदरकर रा. दहिवली कोंड, ता. माणगाव जि .रायगड यांच्या ताब्यात दिला असुन सदर गुन्ह्याची उकल केल्यामुळे परिसरांमधून गोरेगाव पोलीस ठाण्यामधील सर्व पोलिसांचे कौतुक होत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या