हरवंडी येथील साईबाबा मंदिरात चोरी

  हरवंडी येथील साईबाबा मंदिरात चोरी



पोलीस प्रवाह न्यूज 


माणगाव-दि. ३- माणगांव तालुक्यातील हरवंडी येथील साईबाबा मंदिरात चोरी झाल्याची घटना घडली आहे. 
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तरपणे असे की, फिर्यादी चिंतामण पांडुरंग पाचाडकर, वय ६१ वर्षे, व्यवसाय-शांतीनिवास सेवाग्राम आश्रम हरवंडी मॅनेजर, सध्या रा. शांतीनिवास सेवाग्राम आश्रम हरवंडी, ता.माणगाव, मुळ रा. पाचाड, ता. महाड शांतिनिवास सेवाग्राम आश्रम ठिकाणी राहणारे असुन  पाचाड येथे त्यांचे घर आहे. ते गेल्या १० वर्षापासुन शांतीनिवास सेवाग्राम आश्रम हरवंडी येथे मॅनेजर म्हणुन नोकरीला आहेत. हरवंडी येथील शांतीनिवास सेवाग्राम आश्रममध्ये एक श्री. साईबाबा देवाचे मोठे मंदिर आहे. सदर साईबाबा मंदिराची देखभाल हि शांतीनिवास सेवाग्राम आश्रम ट्रस्ट तर्फे केली जाते. मंदिरातील श्री साईबाबाचे मुर्तीला शांतीनिवास सेवाग्राम आश्रमचे कडुन चांदिच्या वस्तु केल्या आहेत. सदर साईबाबचे मंदिरा करीता शांतीनिवास सेवाग्राम आश्रम कडुन देवेंद्र भिकाजी परब यांना मंदिराचे पुजारी म्हणुन ठेवले आहे. सदर पुजारी हे नेहमी सकाळी ४.४५ वा. च्या सुमारास मंदिरात सकाळची आरती व पुजा करण्या करीता येतात व रात्रीची आरती करुन रात्री १०.३० वा. मंदिराचे दरवाज्याला लॉक करुन जातात.
 
दि. १ डिसेंबर  रोजी श्री साईबाबांची मंदिरात रात्रीची आरती करुन पुजारी देवेंद्र भिकाजी परब रात्री १०.३० वा. निघुन गेले. दि. २ डिसेंबर  रोजी  पुजारी नेहमी प्रमाणे सकाळी मंदिरात सकाळची आरती व पुजा करण्या करीता आले असता मंदिराच्या गाभा-याचा दरवाजा उघडा दिसला त्यावेळी साईबाबांच्या मुर्तीचे डोक्यावरील चांदीची छत्री, मुतीर्चे शेजारी भिंतीला असलेल्या संताच्या फोटो फ्रेमवरील रुद्राक्षाची व त्यावर चांदीचे आवरण असलेली माळ, तसेच मंदिरातील स्टीलची दान पेटी दिसुन आली नाही असे फिर्यादी याना  सांगितले. त्यांच्या सोबत मंदिरात खात्री करण्यासाठी गेलो असता तेथे वरील प्रमाणे वस्तु फिर्यादी याना  दिसुन आल्या नाहीत. दोघांचीही खात्री झाली की कोणीतरी अज्ञात चोरट्याने साईबाबांचे मंदिराचे गाभा-याचे मुख्य दरवाजाचे लॉक कशाने तरी तोडुन मंदिराचे गाभा-यात प्रवेश करून  ३५००० रु एक साईबाबांच्या मुर्तीचे डोक्यावरील चांदीची छत्री, तिचे वजन १.२५० ग्रॅम वजन, १४०० रु.  एक संताच्या फोटो फ्रेमवरील रुद्राक्षाची व त्यावर चांदीचे आवरण असलेली माळ, चांदीचे वजन ५० ग्रॅम, १५००० रु एक स्टीलची दानपेटी त्यामध्ये अंदाचे रोख रक्कम असा एकूण ५१४०० रु. किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्यानी लंपास केला. 
   तसेच याच रात्री माणगांव शहरांतील आपला बाजार, इंदापूर व गोरेगाव  येथील एक दुकान सुद्धा चोरट्याने फोडली आहेत. हरवंडी येथील चोरीची माणगांव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो. नि. राजेंद्र पाटील करीत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या