माणगाव मध्ये (ठाकरे गट) शिवसैनिकांकडुन रामदास कदमांच्या प्रतिकात्मक छायाचित्रास जोडे मारो आंदोलन; माणगाव मधील (ठाकरे गट)शिवसैनिकानी ८ मिनिटे मुंबई गोवा महामार्ग रोखून ठेवला.

माणगाव मध्ये (ठाकरे गट) शिवसैनिकांकडुन रामदास कदमांच्या प्रतिकात्मक छायाचित्रास जोडे मारो  आंदोलन.


माणगाव मधील (ठाकरे गट)शिवसैनिकानी  ८ मिनिटे मुंबई गोवा महामार्ग रोखून ठेवला.


पोलीस प्रवाह न्यूज

      माणगाव : दि. २४ - मागील काही दिवसांपूर्वी दापोली येथील शिवसेना शिंदे गटाच्या जाहीर मेळावा व सभेत शिवसेना शिंदे गटाचे नेते व माजी मंत्री रामदास कदम यांनी मातोश्री आणि ठाकरे कुटुंबीयांच्या बाबतीत आक्षेपार्ह विधान केले होते. याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्र भर उमटतं आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून रामदास कदम व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा मोठया प्रमाणावर निषेध नोंदवला जात आहे. अशाच प्रकारे दि. २४ सप्टेंबर रोजी माणगाव तालुका शिवसेना (ठाकरे गट) यांच्याकडून माजी मंत्री रामदास कदम यांच्याविरोधात माणगाव बसस्थानक व हायवे पोलीस चौकी समोर रामदास कदम यांच्या प्रतिकात्मक छायाचित्रवार जोडे मारो आंदोलन करण्यात आले. तसेच रामदास कदम यांचे छायाचित्र फाडून  ठाकरे गट शिवसैनिकांकडून पायदळी तुडविण्यात आले.
 हा  मोर्चा माणगाव बालाजी कॉम्प्लेक्स ते माणगाव बसस्थानक  असा काढण्यात आला होता. यामध्ये माणगाव तालुक्यातील शेकडो माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे समर्थक शिवसैनिक हजर राहिले होते. निम का पत्ता कडवा है....... पन्नास खोके एकदम ओके..... कदमांच्या आणि नारायण राणेंच्या बैलाला......या सरकारचे करायचे काय? खाली डोके वरती पाय अशा प्रकारची घोषणाबाजी माणगाव तालुक्यातील ठाकरे गट शिवसैनिकांकडून करण्यात येत होती.

या आंदोलनात माणगाव तालुक्यातील  ठाकरे समर्थक माणगाव तालुका प्रमुख गजानन अधिकारी, उपतालुका प्रमुख चंद्रकांत पवार, निजामपूर विभाग प्रमुख लक्ष्मण महाळूगे, मुंबई माजी नगरसेवक राजेश सोनावणे, माणगाव नगरसेवक तथा स्वच्छता आरोग्य व क्रीडा सभापती अजित तार्लेकर, युवसेना माणगाव शहरप्रमुख अजिंकेश जाधव व शिवसेना  ठाकरे गट समर्थक शिवसैनिक सिकंदर आमोणकर, प्रभाकर ढेपे, मोनिष टेम्बे, सागर गांधी, राजू चव्हाण, यशवंत कुर्मे, संदेश कळम्बे,अशोक पाटील, नंदुराज वाढवळ, राजा भोनकर, बाळ घोणे, आकाश पालांडे, चंद्रकांत यादव, संजय घोसाळकर आदी उपस्थित होते. आणि विशेष म्हणजे या माणगाव बसस्थानक हायवे पोलीस चौकी समोर झालेल्या या आंदोलनात शिवसैनिकांनी ८ ते १० मिनिटे मुंबई गोवा महामार्ग रोखून ठेवला होता. मात्र माणगाव वाहतूक पोलीस कर्तव्यदक्ष वाहतूक पोलिसांकडून काहीच मिनिटात वाहतूक सुरळीत करण्यात आली.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या