अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार करणा-या शिक्षक आरोपीस अजन्म जन्मठेपेची शिक्षा
जिल्हा न्यायालय माणगाव यांचा ऐतिहासिक निर्णय.
पोलीस प्रवाह न्यूज - गिरीश गोरेगावकर
माणगांव : दि. २० - गोरेगांव पोलिस स्टेशनच्या हद्दीत सन २०१६ ते दि. १७ जुलै २०१९ चे दरम्यान रायगड जिल्हा परिषद मराठी शाळा फलाणी ता. माणगांव येथील जुन्या इमारतीच्या खोलीत घटना घडलेली होती. या घटनेची थोडक्यात हकीकत अशी की, या गुन्हयातील फिर्यादी यांची पिडीत मुलगी व तिची एक मैत्रिण या इयत्ता १ ली पासुन रा. जि. प.मराठी शाळा फलाणी येथे शिक्षण घेत होत्या. व त्यांच्या अज्ञानपणाचा फायदा घेवुन त्या इयत्ता २ री मध्ये शिकत असल्यापासुन आरोपीत याने गैरफायदा घेवून पिडीत दोन मुलींवर जबरदस्तीने वांरवार लैगिंक अत्याचार व अनैसर्गिक अत्याचार करून हा प्रकार कोणाला सांगितला तर मी तुम्हाला मारेन अशी पिडीत मुलींना दमदाटी करून धमकी दिली.
या घटनेची फिर्याद गोरेगांव पोलीसांनी भा .द. वि. स. क. ३७६ (२) (एफ) (आय) (एन), ३७६ (सी) (बी), ३७६ (ओबी), ३७७,५०६, व पोक्सो कायदा कलम ४, ६, ८ तसेच अ.जा.ज.का.क.१(१)(डब्ल्यु)(i)(ii),३(२)(७) अन्वये गुन्हा दाखल केला. या गुन्हयाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी माणगांव शशीकिरण काशीद माणगांव यांनी केला. व दोषारोप पत्र मा. जिल्हा व सत्र न्यायालय माणगांव येथे दाखल केले. या खटल्याची सुनावणी मा. अति. सत्र न्यायाधीश पी.पी. बनकर माणगांव रायगड यांचे कोर्टात झाली. या गुन्हयात पिडीत दोन मुलींची, एका पिडीत मुलीची आई फिर्यादीची व शाळेवर असणा-या सह शिक्षीकेची तसेच वैदयकीय अधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली. या खटल्यामध्ये सहा. सरकारी वकील जितेंद्र म्हात्रे यांनी सरकार पक्षाच्या वतीने काम पाहिले. व कोर्टासमोर प्रभावीपणे युक्तीवाद करून मा. सर्वोच्या न्यायालय व उच्च न्यायालयांचे महत्वाचे न्यायनिर्णय दाखल केले. या केसच्या सुनावणी दरम्यान पैरवी अधिकारी उदय धुमास्कर, पोलीस उपनिरीक्षक छाया कोपनर, पोह शशिकांत कासार, शशिकांत गोविलकर सुनिल गोळे यांनी सहकार्य केले.
या साक्षीदारांची साक्ष व न्यायनिर्णयाच्या आधारे मा. विशेष व सत्र न्यायाधीश पी.पी.बनकर माणगांव-रायगड यांनी या घटनेतील गुन्हयाच्या शाबीतीनंतर आरोपी यास दि.१९ मे रोजी दोषी ठरवुन भा. द. वि. स. क.३७६,३७७, व पोक्सो कायदा कलम ४, ६, ८, नुसार कारावास आजन्म कारावास (मरेपर्यंत) सक्तमजुरीची व १,५०,०००/- हजार रूपये दंड, दंड न भरल्यास ०१ वर्ष साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.



0 टिप्पण्या