मोर्बा येथे सापडला मृतदेह ; ओळख पटविण्यासाठी माणगांव पोलीसांचे आवाहन
पोलीस प्रवाह न्यूज
माणगाव : दि. १८ - माणगाव पोलीस ठाणे हद्दीत दि. १८ मे रोजी मोर्बा गावचे हद्दीत अनोळखी पुरुष जातीचे ३८ ते ४२ वयोगटातील अंगात नेसुस आकाशी व काळ्या रंगाचा स्पोर्ट हाफ टी शर्ट त्यावर इंग्रजी मध्ये ARSHAVIN व मोठया आकड्यात २३ नंबर पाठीमागील बाजूस असलेला मळकट व खराब झालेला, तसेच काळ्या रंगाची साधी फुल पॅन्ट, कमरेला नारंगी रंगाचा दोरा पॅन्टला बांधलेला अशा वर्णनाचा संपूर्ण सडलेल्या कुजलेल्या अवस्थेत आढळला आहे.
या इसमाची ओळख पटली नसून सदर बाबत माणगाव पोलीस ठाणे येथे अकस्मात मृत्यू रजि नंबर १५/२०२२ सीआरपीसी १७४ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोसई गायकवाड करीत आहेत.
या इसमास ओळखल्यास माणगाव पोलीस ठाणे येथे संपर्क करण्याचे आवाहन माणगांव पोलीसनी केले आहे.
फो.न.02140263005
पोसई गायकवाड मो.न.9307351289




0 टिप्पण्या