माणगांवमध्ये आगामी सणांनिमित्ताच्या अनुषंगाने पोलिसांचे पथसंचलन
पोलीस प्रवाह न्यूज
माणगाव : दि. ९ - रायगड जिल्ह्यात तसेच संपूर्ण महाराष्ट्रात श्री राम नवमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, हनुमान जयंती, रमजान ईद हे सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. या अनुषंगाने माणगाव पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी माणगांव पोलीस यंत्रणा सज्ज झालेली आहे. माणगाव शहरात रूट मार्च काढण्यात आला. तसेच माणगाव बस स्टँड येथे दंगा काबू योजना घेण्यात आली माणगांव पोलीस ठाणे हद्दीत माणगांव पोलीसानी आगामी सणाच्या अनुषंगाने माणगाव पोलीस ठाणे हद्दीत पथसंचलन दि. ९ एप्रिल रोजी करण्यात आले.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माणगांव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक असवर यांच्या सह ४० पोलीस कर्मचारी माणगाव येथे हजर होते. यांनी पंथसंचलनात सहभाग घेतला.
सुयोग्य पोलीस बंदोबस्त कायदा व सुव्यवस्थच्या अधीन राहून शांततेने पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झालेली आहे. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये,व लोकांमध्ये जनजागृती व्हावी ह्या अनुषंगाने माणगांव पोलीस ठाणे ते संपूर्ण माणगांव बाजारपेठत पथसंचलन घेण्यात आले. या वेळी उपस्थीत नागरिक उत्सुकतेने पोलीसांचे पथसंचलन पाहत होते.




0 टिप्पण्या