कार्यक्षमता पाहिल्यावर ना. आदिती यांना कॅबिनेट पद द्यायला पाहीजे -ना. जयंत पाटील

कार्यक्षमता पाहिल्यावर ना. आदिती यांना कॅबिनेट पद द्यायला पाहीजे -ना. जयंत पाटील


पोलीस प्रवाह न्यूज 

महिला आमदार किती कार्यक्षम असू शकते यांचं उत्तम उदाहरण म्हणजे ना. आदिती तटकरे-ना. जयंत पाटील

      कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी  परिवार संवाद यात्रा 


माणगांव : दि. १३ - राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या परिसंवाद यात्रेच्या पाचव्या पर्वानिमित्त बुधवार दि. १३ एप्रिल रोजी गांधी मेमोरिअल हॉल माणगांव येथे श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात एक महिला आमदार किती कार्यक्षम असू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे ना. आदिती तटकरे. तळागाळातील कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी परिसंवाद यात्रेचे आयोजन केल्याचे  महाराष्ट्र राज्य जलसंपदा, लाभक्षेत्र विकास मंत्री तथा राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी सांगितले. 

 तसेच ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये पक्ष सत्तेवर आल्यानंतर आमच्या पक्षाच्या  कार्यकर्त्यांच्या पक्षाकडून काय अपेक्षा आहेत आणि आम्ही सरकार मध्ये बसलेलो आहोत त्या सरकारकडून आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या काय अपेक्षा आहेत हे समजून घेण्यासाठी महाराष्ट्रभर आम्ही गेली काही महिनाभर फिरत होतो. आज अशी हि आमची परिवार संवाद यात्रा गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यापासून सुरु झालेली ती आज माणगाव तालुक्यात पोहचली आहे.   संवाद राष्ट्रवादी परिवाराचा..... जनतेच्या हिताचा हे ब्रीदवाक्य घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे  संवाद यात्रेचे आयोजन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. यावेळी ना.पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातील माणगाव, रोहा, तळा, म्हसळा, श्रीवर्धन या पाचही तालुक्यांचा पक्ष वाढीच्या दृष्टीने आढावा घेतला.

 या संवाद यात्रेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जयंत पाटील यांनी सुरुवातीला ना.आदिती तटकरे यांचे कौतुक करत असताना सांगितले कि, जनतेच्या वेगळ्या अपेक्षा, गरजा सांभाळात आमदार म्हणून काम करणे काही सोपं नाही. पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या बाबतीत अभिमानस्पद बोलताना ना.पाटील पुढे म्हणाले कि मला अभिमान वाटतो अदितीचा कि तिने एवढं सुंदर आणि उत्तम काम केलेलं आहे. ना. आदिती तटकरे यांचे काम बघून त्यांना कॅबिनेटमध्ये मंत्रिपद दिलं पाहिजे. महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक विधानसभा क्षेत्रात मी आणि माझे सर्व पक्षाचे पदाधिकारी आम्ही जमतो.तुमचं म्हणणं काय आहे? ते समजून घ्यावं यासाठी हि  परिवार संवाद यात्रा असल्याचे सांगत श्रीवर्धन विधानसभा  मतदार संघाच्या लोकप्रतिनिधी आदिती तटकरे या एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात सर्वसमावेशक काम करीत आहेत.  तुम्हाला अधिकच्या सूचना करण्याची आवश्यकता भासली नाही हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अभिमान वाटत असल्याचे त्यांनी  व्यक्त केले. 

    या परिसंवाद यात्रेवेळी खा.सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, विधानपरिषदेचे आ.अनिकेत तटकरे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, प्रदेश युवती जिल्हाध्यक्ष सक्षणा सलगर, प्रदेश महिला सरचिटणीस दीपिका चिपळूणकर, प्रदेश महिला निरीक्षक रुपाली दाभणे, श्रीवर्धन मतदार संघाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष महम्मद मेमन, जेष्ठ नेते शेखरशेठ देशमुख, अली कौचाली, जेष्ठ नेते मधुकर पाटील, जेष्ठ नेते महादेवराव बक्कम, माणगाव तालुका समन्वय समिती अध्यक्ष इकबाल धनसे, म्हसळा समन्वय समिती अध्यक्ष नाझीम हसवारे, माणगाव तालुकाध्यक्ष सुभाष केकाणे, तळा तालुकाध्यक्ष नाना भौड, रोहा तालुकाध्यक्ष विनोद पाशिलकर, म्हसळा तालुकाध्यक्ष समीर बनकर, श्रीवर्धन तालुकाध्यक्ष दर्शन विचारे, माणगाव माजी नगराध्यक्ष आनंदशेठ यादव, जिल्हा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष रवींद्र मोरे, जिल्हा युवती अध्यक्षा अँड.सायली दळवी, महिला आघाडी माणगाव तालुकाध्यक्षा संगीता बक्कम, उपाध्यक्षा श्रद्धा यादव, माणगाव माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर उभारे, दिलीप जाधव, संदीप खरंगटे, प्रदेश राष्ट्रवादीचे युवक सचिव दीपक जाधव, शहर अध्यक्ष महमूद धुंद्वारे, तळा पंचायत समिती सभापती अक्षरा कदम, राष्ट्रवादीचे जिल्हा मागासवर्गीय विभागाचे अध्यक्ष अँड.उत्तम जाधव, तळा उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, माणगाव तालुका युवक अध्यक्ष रुपेश तोडकर, नगरसेविका रिया उभारे, माजी नगराध्यक्षा योगिता चव्हाण, तालुका उपाध्यक्ष राजू मोरे, गोरेगाव विभाग राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल अध्यक्ष राहुल दसवते, सुनील गवाणे, माजी जिल्हा परिषद सदस्य बबन मनवे, सदस्या गीता जाधव, जिल्हा महिलाध्यक्षा उमा मुंढे, जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे, साई सरपंच हुसेन रहाटविलकर, काका नवगणे, गणेश पवार,माणगाव पंचायत समिती सदस्य शैलेश भोनकर, उणेगाव सरपंच राजेंद्र शिर्के, शहर युवक अध्यक्ष विक्रांत गायकवाड, प्रभाकर मसुरे, सौरभ चांदोरकर,सचिन देसाई,सिद्धांत देसाई, चेतन गव्हाणकर, नगरसेवक, नगरसेविका यांच्यासह कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.


खा. सुनील तटकरे यांनी आपल्या मार्गदर्शनात बोलताना सांगितले कि, सन २००९ मध्ये मतदार संघाची पुनर्रचना होऊन नव्या श्रीवर्धन मतदार संघाची निर्मिती झाली. जुन्या १४ माणगाव-रोहा विधानसभा मतदार संघातून मला जनतेने सलग ३ वेळा विधानसभेवर निवडून दिले. त्यानंतर श्रीवर्धन मतदार संघाची निर्मिती झाल्यावर श्रीवर्धन व म्हसळा तालुक्याचा विकास हाच आपला ध्यास या मुद्दयावर निवडणुकीला सामोरे गेलो. प्रचंड प्रमाणात मतदार संघात विकासकामे करण्याची जबाबदारी घेतली. त्यामुळेच विधानसभेवर जनतेच्या आशीर्वादाने निवडून गेलो. यानंतर श्रीवर्धन मतदार संघात जास्तीत जास्त विकासकामे करण्याचा प्रयत्न केला. निसर्ग चक्रीवादळ, पूरपरिस्थिती अशा अनेक आपत्तीच्या काळात नागरिकांचे विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने तनमन धनाने काम केले. महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तेवर आल्यावर अदितीला काम करण्याची संधी मिळाली. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद तिला मिळाले. आमच्या सर्वांचे थेट जनतेशी संपर्क असल्याने त्यातूनच मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. श्रीवर्धन मतदार संघात ३४७ मतदान केंद्रे असून प्रत्येक ठिकाणी बूथ कमिट्या स्थापन करणे आवश्यक असून त्यातून जनतेचे आणखी काही प्रश्न मार्गी लागतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  

      राज्यमंत्री तथा  पालकमंत्री ना. आदिती तटकरे यांनी आपल्या मार्गदर्शनात बोलताना सांगितले कि,२०१९ साली झालेल्या  निवडणुकीमध्ये पहिल्यांदा विधानसभा मतदार संघाला महिला आमदार याठिकाणी निवडून आल्या.  आणि ज्यावेळेला मतदान झालं १५७००० मतदान झालं त्यापैकी ७८००० मतदान पुरुष मंडळींचं आणि ७८५०० मतदान हे महिला भगिनींनी त्याठिकाणी केलं. आणि मग  मोठ्या मताधिक्यांनी याठिकाणी निवडून येत असताना माझ्या तळागाळातील कार्यकर्त्यांशी माझ्या आजोबांपासून वडिलांसमवेत काम केलेले सर्वसामान्य पदाधिकारी असतील यांनी तितकी मेहनत केली कि घरातली मी लेक असल्यासारखं ज्यांनी मला प्रेम दिलं. आणि मतमोजणी ज्यावेळेला सुरु झाली त्यावेळेला पहिल्या राउंडपासून शेवटच्या राऊंडपर्यंत एकही राउंड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पिछाडीवर राहिला नाही तर आघाडीवरच राहिला याचे सर्व श्रेय या समोरच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना जाते. म्हणूनच आज राज्यमंत्री म्हणून काम करत असताना त्याठिकाणची पालकमंत्री म्हणून काम करत असताना जी काही मला संधी मिळत आहे ती खऱ्या अर्थानं या पाच तालुक्यांमुळे रोहा, तळा, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन.  जी जी काही खाती आपल्याकडं उपलब्ध आहेत त्यातून जास्तीत जास्त आपण या मतदार संघात काम करण्याचा प्रयत्न करत आहोत. साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करीत असताना पर्यटन प्रादेशिकपर्यटन अंतर्गत आणि विविध योजनांतर्गत गेल्या दोन अडीच वर्षांमध्ये जवळपास २० ते २५ कोटींचा निधी हा फक्त श्रीवर्धन तालुक्यासाठी उपलब्ध केला अशा अनेक विकासकामांचा आढावा ना.तटकरे यांनी यावेळी घेतला.  

   राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या परिसंवाद यात्रेत पदाधिकाऱ्यांची शाळा घेतली. पदाधिकाऱ्यांची हजेरी घेऊन प्रश्नांची सरबत्ती केली. त्यांच्या या झाडाझडतीमुळे पदाधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे यावेळी पहायला मिळाले. पक्ष संघटना मजबूत करण्याची निर्देशही त्यांनी यावेळी दिले.  यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष, तालुका अध्यक्ष, महिला तालुका अध्यक्ष, युवक आणि युवती संघटनांचे पदाधिकारी आणि शहर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची  झाडाझडती घेतली. पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतांना त्यांनी पक्षबांधणीतील कच्चे दुवे दाखवून दिले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या