माणगांव नगरपंचायतमध्ये सत्तापरिवर्तन माणगांव विकास आघाडीची सत्ता.

 


पोलीस प्रवाह न्यूज 

माणगांव : दि. १९- रायगड जिल्ह्यातील प्रतिष्ठेची व विकसनशील शहर म्हणून ओळख असणाऱ्या माणगांव शहराच्या नगरपंचायतीचे एकूण १३ जागांसाठी चे मतदान २१ डिसेंबर रोजी घेण्यात आले व ओबीसी आरक्षण अनारक्षित झाल्याने उर्वरित ४ जागांसाठी चे मतदान १८ जानेवारी रोजी घेण्यात आले. या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस व भाजप अशी माणगांव विकास आघाडी करण्यात आली होती तर शेकाप ला १ जागा देऊन राष्ट्रवादी शेकाप अशी आघाडी करण्यात आली होती.माणगांव विकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशीच खरी लढत दिसून आली.यामध्ये शिवसेना भाजप काँग्रेस च्या नेत्यांनी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे देखील ३ उमेदवार रिंगणात होते तर ३ ठिकाणी अपक्ष उमेदवार लढवत होते.असे १७ जागांसाठी एकूण ४० उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले होते.

     या निवडणुकीत ची मतमोजणी दिनांक १९ जानेवारी रोजी मध्यवर्ती प्रशासकीय भवन माणगांव सभागृहात पार पडली, निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी माणगांव प्रशाली दिघावकर -जाधव,नगर पंचायत मुख्याधिकारी राहुल इंगळे, व पोलीस प्रशासनाच्या चोख बंदोबस्तामध्ये ही मतमोजणी घेण्यात आली.आणि या निकालात माणगांव विकास आघाडीचे ९ तर राष्ट्रवादी शेकाप आघाडीचे ८ उमेदवार विजयी झाले आहेत.


    प्रभागानिहाय विजयी उमेदवार.


प्रभाग क्रमांक-१.

जाधव लक्ष्मी चंद्रकांत(राष्ट्रवादी)- विजयी.


प्रभाग क्रमांक-२.

खैरे सुविधा संतोष(राष्ट्रवादी)- विजयी.


प्रभाग क्रमांक-३.

 यादव आनंद शिवराम(राष्ट्रवादी)- विजयी.


प्रभाग क्रमांक-४.

थोरे ममता कुंडलिक(शेकाप)- विजयी.


प्रभाग क्रमांक-५.

मेहता राजेश गोकुळदास(माणगांव विकास आघाडी)- विजयी.


प्रभाग क्र. ६ 

हर्षदा सतिश सोंडकर(राष्ट्रवादी)- विजयी.


प्रभाग क्रमांक-७.

 वाढवळ सुशिला शिवाजी(राष्ट्रवादी)-विजयी.


प्रभाग क्र. ८.

नंदिनी नितीन बामुगडे(माणगांव विकास आघाडी)-विजयी.


प्रभाग क्रमांक-९.

 मुंढे रश्मी सागर(राष्ट्रवादी)- विजयी.


प्रभाग क्रमांक-१०.

उभारे रिया रत्नाकर(राष्ट्रवादी)- विजयी.


प्रभाग क्रमांक-११

गायकवाड कपील नरेंद्र(माणगांव विकास आघाडी)- विजयी.

 

प्रभाग क्रमांक-१२.

तार्लेकर अजित चंद्रकांत(माणगांव विकास आघाडी)- विजयी.


प्रभाग क्रमांक-१३.

सुर्वे शर्मिला शोभन(माणगांव विकास आघाडी)- विजयी.


प्रभाग क्र. १४

सचिन मारुती बोंबले(माणगांव विकास आघाडी)- विजयी.


प्रभाग क्रमांक-१५

साबळे प्रशांत अशोक(माणगांव विकास आघाडी)- विजयी.


प्रभाग क्रमांक-१६.

पवार ज्ञानदेव मारुती(माणगांव विकास आघाडी)- विजयी.


प्रभाग क्र. १७

दिनेश बाळकृष्ण रातवडकर(माणगांव विकास आघाडी)- विजयी.


अश्याप्रकारे माणगाव नगरपंचायत एकूण १७ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस- ७

शेकाप-१

माणगांव विकास आघाडी-९

अश्या जागा  निवडुन आल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या