पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते व्हेंटिलेटरचे लोकार्पण ; क्लॅरीअंट कंपनीच्या सीएसआर फंडातून व्हेंटिलेटर मशीनची उपलब्धता.

पोलीस प्रवाह न्यूज

रायगड दि. ६. रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या माणगाव तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय माणगांव येथे दि. ५ जून रोजी राज्यमंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते व्हेंटिलेटरचे लोकार्पण करण्यात आहे. हे व्हेंटिलेटर रोहा येथील क्लॅरीअंट कंपनीच्या सीएसआर फंडातून रुग्णालयाला देण्यात आले.  टाटा पॉवर हाऊस भिरा यांच्या सामाजिक दायित्वातुन उपजिल्हा रुग्णालयास वाहनांसाठी पार्कींग शेड व पेव्हर ब्लॉक यांच्या केलेल्या कामाची पाहणी यावेळी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केली. मुगवली येथे बाल रुग्णांच्या कोविड सेंटरची पाहणी सुद्धा पालकमंत्री यांनी केली. पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आदीती तटकरे यांच्या हस्ते मुगवली येथे वृक्षारोपण ही करण्यात आले. 

यावेळी रा. कॉ. तालुका अध्यक्ष सुभाष केकाणे,  नगराध्यक्षा योगीता चव्हाण, महिला अध्यक्षा संगीता बक्कम, तहसीलदार प्रियांका आयरे कांबळे, नगरसेवक रत्नाकर उभारे, दिलीप जाधव,  जयंत बोडेरे,  रवी मोरे, महामुद धुंदवारे, गणेश चव्हाण, संतोष दोशी,  किशोरी हिरवे, वैद्यकीय अधीक्षक प्रदीप इंगोले, डॉ. तुषार शेठ, डॉ. शांतीनाथ डोईफोडे, संजय गांधी, आदी कार्यकर्ते व रुग्णालय कर्मचारी उपस्थीत होते.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता आरोग्य यंत्रणा अधिकाधीक सुसज्ज करण्यासाठी राज्य सरकार भर देत आहे. त्यामुळे क्लॅरीअंट कंपनीने केलेले हे योगदान अतिशय मोलाचे आहे. त्यांचा आदर्श घेऊन अनेक कंपन्या व सामाजिक संस्था यांनी सुद्धा आरोग्य यंत्रणाला हातभार लावण्यासाठी मदत करावी असे आवाहन ही यावेळी करण्यात आले.

पर्यावरण दिनाचे औचित्य साधून राज्यमंत्री तथा पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते मुगवली येथे वृक्षारोपण करताना.  





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या