पोलीस प्रवाह न्युज
रायगड : दि - राज्यशासनाने निर्गमित केलेला लॉकडाऊन व संचारबंदी ३० एप्रिल पर्यंत असणार आहे. यामध्ये चित्रपट सिनेमागृहासोबत, सलून, स्पा, ब्यूटी पार्लर यांच्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये नाभिक समाज पिळवटून निघेल. राज्यभरात विविध नाभिक समाज संघटना, व सलून ब्युटीपार्लर असोशीएशन यांच्याकडून राज्य सरकार व शासन निर्णयांचा निषेध केला जात आहे. रायगड जिल्हा नाभिक तरुण संघातर्फे सलून व ब्युटीपार्लर चालू ठेवण्यासाठी माणगांव तहसीलदार भाबड यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष सुदाम शिंदे, सुरेंद्र पालांडे, दिलीप जाधव, कांता हुजरे, सुरेश यादव, सौरभ पांडे, विलास यादव, शानु शहा, सुयोग यादव आदी पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते.
नाभिक समाज हा रायगड जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाज असून अनेक तालुक्यातील ग्रामीण भागात विखुरलेला आहे. यापैकी बहुतांशी समाज बांधव व महिला भगिनी यांचे उदरनिर्वाहाचे साधन म्हणून पारंपरिक सलून व ब्युटी पार्लर आहे. हेच बंद राहिल्यास त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ शकते. मागील लॉकडाऊन मध्ये २८ सलून व्यावसायिकानी आत्महत्येचा मार्ग निवडला. याची पुनरावृत्ती होऊ शकते, कारण सलून व्यावसायिक हा हातावर रोजच्या रोज कमावून पानावर खाणारा समाज आहे.
मागील ७ ते ८ महिने सलून दुकान बंद राहिल्याने थकीत वीज बिले व घरभाडे, शाळेची फी अद्यापही पूर्ण भरता आलेली नाही. उत्पन्नाचे इतर कोणतेही साधन उपलब्ध नसल्याने तसेच कोरोनाच्या भीतीमुळे ग्राहकांनी देखील पाठ फिरविल्यामुळे गेले वर्षभर आमचा पुरता हवालदिल झाला आहे. आपल्या सरकारकडे वारंवार आर्थिक मदतीची विनंती तथा निवेदन देऊनही आपण अद्याप कसलीही दखल घेतलेली नाही. नाभिक समाजाकडून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाच्या सर्व आदेशाचे काटेकोरपणे पालन करून शासनास नेहमीस सहकार्य केलेले आहे. आजवर सलून, ब्युटीपार्लर यांच्यातून कोरोनाचा संसर्ग झाल्याचे एकही उदाहरण ऐकण्यात आलेले नाही. मग आमच्याच व्यवसायावर हा अन्याय का? शांत संयमी आमचा नाभिक समाज नेहमीच आपल्या सरकारला सहकार्य करीत आहे. कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन आजवर समाजाने स्वतः सोबत आमच्या ग्राहक वर्गाची ही योग्यती खबरदारी काळजी घेऊन मोडकळीस आलेला आमचा व्यवसाय सावरण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. असे असतानाही पुन्हा लॉकडाऊन लादून समाजचावर उपासमारीची वेळ येणार नाही याची खबरदारी घेऊन नियम व अटी घालून सलून व ब्युटीपार्लर चालू ठेवण्याची परवानगी द्यावी अन्यथा नाभिक समाज प्रापंचिक जाचाला आणि भूकमारीला कंटाळून आंदोलन करण्यास उतरण्यास भाग पाडु नये अशी नम्र विनंती रायगड जिल्हा नाभिक तरुण संघाचे अध्यक्ष सुदाम शिंदे यांनी केली आहे.



0 टिप्पण्या