३ लाख १० हजाराचा मुद्देमाल जप्त.
चोरी व मौज मजेसाठी वाहने चोरणाऱ्या चोरटयांना चिंचवड पोलीसांनी अटक करुन ०१ रिक्षा , ०७ मोटार सायकलीसह ६१ हजारांची तांब्याची भांडी हस्तगत केली आहेत .या बाबत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

पिंपरी (प्रतिनिधी) :
चिंचवड पोलीस स्टेशन हद्दीत वाहन चोरी,घरफोडी यांना प्रतिबंध करण्यासाठी चिंचवड तपास पथकाचे पोलीस नाईक शेलार व पोलीस शिपाई भदाणे हद्दीत पेट्रोलींगकरीत असताना रिव्हरव्युह हॉटेलजवळ त्यांना एक प्रायव्हेट नंबर प्लेटची ऑटो रिक्षावर (एम.एच १४ पी.ए ९२२१) संशय वाटल्याने रिक्षा चालकास थांबविण्यास सांगितले असता त्यांनी रिक्षा थांबविली नाही .रिक्षाचा पाठलाग करून अडविले असता रिक्षामधून तिन मुले पळून जात असताना शेलार व भदाणे यांनी दोन मुलांना पाठलाग करून ताब्यात घेतले.त्यांची नावे इम्रान रहिम शेख (वय -१ ९ रा . वेताळनगर झोपडपटटी , चिंचवड ),अमर सुनिल वाघमारे (वय -१ ९ रा. मोरया हौ.सोसा.चिंचवड) यांना रिक्षाच्या कागदपत्राबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवा–उडवीची उत्तरे दिल्याने अधिक चौकशीसाठी पोलीस चौकीत आणुन रिक्षाची माहिती घेतली असता सदरची रिक्षा ही चोरीची असून त्याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात गु.र.नं ३१६/२०२० भा.दं.वि. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे उघड झाले.या बाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे यांचे मार्गदर्शना खाली तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव यांनी आरोपींना वरील गुन्हयात अटक करून विश्वासात घेवुन इतर ठिकाणी केलेल्या चोरीबाबत चौकशी केली असता त्यांनी मौज, मजा करण्यासाठी व फिरण्यासाठी चिखली,भोसरी,चिंचवड,वाल्हेकरवाडी भागातुन मोटार सायकली चोरल्याचे कबूल केले .
त्यांचेकडून तपासात चोरी केलेल्या ०७ मोटार सायकली जप्त केल्या आहेत.तसेच त्यांनी विधीसंघर्षांत बालकाच्या मदतीने वरील चोरलेल्या रिक्षाचा वापरकरून चिंचवडेनगर येथून एका टेम्पोतून रात्रीच्या वेळेस तांबे व ऍल्युमिनियमची भांडी चोरल्याचे कबुल केले.आरोपींनी चोरलेल्या रिक्षा व मोटार सायकलीबाबत विवीध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. आरोपीकडून एकुण १ ऑटो रिक्षा ७ मोटार सायकली व ६१ हजार रुपयांची तांब्याची भांडी असा एकूण ३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे .पुढील तपास चिंचवड पोलीस करीत आहेत .सदरची कामगीरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे यांचे मार्गदर्शना खाली तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव ,पोलीस हवालदार पांडुरंग जगताप , स्वप्निल शेलार ,रुषीकेश पाटील , विजयकुमार आखाडे , पंकज भदाणे , नितीन राठोड , गोविंद डोके , अमोल माने , सदानंद रुद्राक्षे यांनी केली .

0 टिप्पण्या