कुराश असोसिएशन संलग्न महाराष्ट्र पोलीस मित्र समिती- सांगली जिल्हा अध्यक्षपदी विवेक खरोटे यांची निवड.
जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र पोलीस मित्र समिती यांचे वतीने संपूर्ण महाराष्ट्र मध्ये संघटनेचे काम वाढवण्यासाठी जिल्हा व तालुका पातळीवर पदाधिकारी यांच्या निवडी करण्यात येत आहेत.
यामध्ये सांगली जिल्हा अध्यक्षपदी मा. विवेक खरोटे यांची नुकतीच निवड करण्यात आली.
त्याच बरोबर पुणे शहर अद्यक्ष पदी जयवंत राव भोसले ,व बारामती तालुका अद्यक्ष पदी सुरज तावरे यांचीही निवड करण्यात आली.
कुराश असोसिएशन ही एक क्रीडा क्षेत्राशी संबंधित जागतिक पातळीवरील काम करणारी संस्था आहे,भारतातील खेळ हे जागतिक पातळीवर पोहोचवण्यासाठी ही संस्था विशेष कार्य करत आहे त्याच बरोबर कला, क्रीडा सांस्कृतिक अशा अनेक क्षेत्रात देखील ही संस्था कार्य करीत आहे.
पोलिसांचे प्रश्न असोत किंवा त्यांना मदत करणे असो तसेच त्यांच्यामध्ये प्रेरणा निर्माण करणे असो या उदात्त हेतूने या संस्थेशी संलग्न पोलीस मित्र समिती महाराष्ट्र मध्ये काम करत आहे.
पोलीस मित्र समिती पोलिसांच्या बरोबरीनेच समाजातील विविध क्षेत्रात सामाजिक, सांस्कृतिक तसेच अन्यायकारक गोष्टींना न्याय मिळवून देण्याचे काम देखील पोलीस मित्र समितीच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
नवीन तरुण/तरुनी यांनी खेळांमध्ये आवड निर्माण करून यशाचे शिखर गाठावे. चांगला अभ्यास करून अधिकारी व्हावे,. यासाठी गरीब गरजू व्यक्तींना त्यांच्या क्षेत्रातील कलागुणांना वाव देऊन पोलीस मित्र समितीच्या माध्यमातून मदत करू असे प्रतिपादन सांगली जिल्हा अध्यक्ष विवेक खरोटे यांनी केले.


1 टिप्पण्या
Ohh that really great...
उत्तर द्याहटवा