15 ऑगस्ट या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने प्राधिकरण पोलीस चौकी,तसेच सिंहगड पोलीस स्टेशन येथे पोलीस मित्र संघ महाराष्ट्र राज्य यांचे वतीने कोरोना या महामारिच्या संकटकाळामध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीला धावणाऱ्या व या महामारी विरुद्ध लढणाऱ्या समाजसेवकांचा "कोरोना योद्धा" म्हणून सन्मान करण्यात आला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा शेळके साहेब तसेच पोलीस उपनिरीक्षक श्री. महेंद्र अहेर यांचे वतीने समाज सेवकांना कोरोना योद्धा प्रमाण पत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
या प्रसंगी पोलीस मित्र संघाचे अध्यक्ष श्री. शाम घाडगे यांनी पोलीस मित्रांची समाजासाठी गरज व संकट काळी व नैसर्गिक आपत्तीचे वेळेस पोलीस मित्रांद्वारे केले जाणारे मदत कार्य याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास पोलीस अधिकारी श्री. महेंद्र अहेर साहेब, श्री. सुनील जाधव साहेब, पोलीस मित्र संघाचे अध्यक्ष श्री शाम घाडगे साहेब, पोलीस मित्र श्री. अविनाश जोशी, श्री. धर्मराज बनसोडे, श्री. कायदेशीर सल्लागार मा. अजित बोराडे, श्री. मयूर थोरात, श्री. गौरव गोळे, श्री. अश्विन गद्रे, श्री. दतात्रय जाधव, श्री. राकेश भोईटे, श्री. शिवाजी मिसाळ, श्री उमेश म्हस्के, श्री. सौरभ वाघमारे तसेच मोठया संख्येने पोलीस मित्र उपस्थित होते.






1 टिप्पण्या
Asharma72855@gmill.cam
उत्तर द्याहटवा