पोलीस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले यांच्या सह ,जळगांव एल सी बी च्या कामगिरी चे जनमानसात कौतुक.

       जळगांव पोलीस अधीक्षक डॉ पंजाब राव उगले

प्रतिनिधी जळगांव जिल्हा -  जितेंद्र चौधरी 

जळगांव जिल्ह्यातील मुक्ताईनगर या गावातील पंचायत समितीचे माजी सभापती दिनकर ओंकार पाटील यांच्या खून प्रकरणात फरार असलेल्या कार्तिक टोपलिया उर्फ सुपड्या जाधव इंदूर मध्यप्रदेश याला जळगांव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने इंदूर येथे अटक केली गुन्हा घडल्या दिवसापासून कार्तिक हा फरार होता तो मध्यप्रदेश पोलिसांच्या रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध तेथे गुन्हे दाखल आहेत. माजी सभापती हे 17 जून रोजी पहाटे कुऱ्हा येथील पट्रोल पंपावर झोपलेल्या अवस्थेत असतांना धारदार शस्त्रने खून झाला होता. या प्रकरणी मुक्ताई नगर पोलीस ठाण्यात तसा गुन्हा दाखल असून या प्रकरणी कार्तिक टोपलिया हा संशयित फरार झाला होता.त्याच्या शोधार्थ जळगांव पोलीस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी स्वतंत्र पथके नेमली होती. जळगांव एल सी बी चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहम व मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेश शिंदे यांनी सहा. इन्स्पेक्टर माधवराव पाटील .पोलीस कॉन्स्टेबल   रवींद्र पाटील. कमलाकर बागुल. दादाभाऊ पाटील. अशोक पाटील विजय पाटील नरेंद्र वारुळे. या पथकावर जबाबदारी सोपविली होती .या पथकाने केलेल्या चौकशीत कार्तिक हा इंदूर शहरात असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा लावून त्यास ताब्यात घेतले आहे.तसेच जळगांवात सध्या लॉकडाऊन सुरू असून लॉकडाऊन चे पालन व्हावे यासाठी पोलीस अधीक्षक रस्त्यावर उतरून अधिकाऱ्यांना सक्त कारवाई करण्याचे  आदेश दिले आहेत .या कारवाईत जळगांव जिल्ह्यात लॉकडाऊन चे उल्लंघन करणाऱ्या 7हजार 862 जणांवर कारवाई तसेच 1134 वाहने जप्तसह करण्यात आली असून अश्या अनेक  कामगिरी बघून जळगांव पोलीस अधीक्षक डॉ पंजाब राव उगले यांच्या सह स्थानीक गुन्हे शाखेचे जनमानसात कौतुक केले जात आहे.     
  ।पोलीस प्रवाह न्युज l

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या