वैभव सत्वे, प्रतिनिधी
माणगाव : दि २३- अवैधरित्या वाळू उत्खनन करून ती वाळू विकण्यासाठी पाठविण्याच्या तयारीत असताना महसूल विभागाने कारवाई करित सुमारे साडेतेवीस लाखांचा मुद्देमाल जप्त करित एकूण १७ जणांच्या विरोधात गोरेगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
गोरेगांव पोलीस ठाण्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भांडिवली गावच्या हद्दीत काळ नदीच्या पात्रात अवैध वाळू उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळताच नांदवी सजाचे तलाठी वैभव वामन आंब्रे ( वय ३८ , रा. माणगांव ) यांनी जागेवर जावून कारवाई करित पाच ट्रक, एक पिकअप , सात बोटी आणि सात ब्रास वाळू या सह एकूण २३६०१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
श्री. आंब्रे यांनी गोरेगांव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी सुएब जहीरूद्दीन सरखोत ( ३५ रा वनी पुरार ), फैसल नझीर वजगरे ( ३२ ), आसीफ नझीर वसगरे ( २८ ) , नौशाद नझीर वजगरे . ( ३६, सर्व रा नांदवी ) , शरीफ इस्माईल महाळूनकर उर्फ कैची ( ५०, रा टोळ), मास्टर भालचंद्र महाले ( २८ , रा गोरेगांव ) , नबील हमीद वजगरे ( २६ , रा भांडीवली ) , धोंडू गौरू गावडे ( ५४ , रा . वडगांवकोंड) , समीर मोहमंद अली पोटे ( ३० , रा पुरार ) , नजीर अब्दुल रहमान टोळकर ( ४३ , रा टोळखुर्द ) , रहेमान बंदेनवाज डिग्गी ( ३५ , रा मोर्बा ) , गणपत तुकाराम खिडबिडे ( ५६ . रा पुरार ) संजय तुकाराम जाधव ( वय. २८, रा मढेगांव ), दिनेश कृष्णा मुकणे ( २४ , रा मढेगांव ) , देहू शांताराम जाधव ( ४o, रा टोळ) , सुनील नारायण महाडीक ( ४३ . रा वडघर ) आणि कृष्णा गावडे ( ४३. रा वडगांव कोंड) या सतरा जणांविरोधात कलम ३७९ , ३४ सह महाराष्ट्र गौण खनिज कायदा १९५७ चे कलम ४ , २१, २३ तसेच जमीन महसूल अधिनियम ४८ ( ७ ) , ४८ ( ८ ) अन्वये गुन्हा दाखल केला .
पोलीस प्रवाह न्यूज
#covid19 #coronavirus #lockdown #raigad #goregaon#Maharashtranews

0 टिप्पण्या