जामखेड प्रतिनिधी -
सागर पवार
पोलीस प्रवाह न्युज
नगर जिल्ह्यातील जामखेडमध्ये विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे एकच हाहाकार उडाला. बसरवाडी येथे गारपिटीने पाच शेळ्या मेल्या तर नाहुली येथे वीज पडल्याने एक जण जखमी झाला आहे. तर अनेक ठिकाणी झाडे व विजेचे खांब उन्मळून पडले. अनेक ठिकाणी गारपीट झाल्याने फळपिकांसह इतरही नुकसान झाले आहे. अनेकांच्या घरांचीही पडझड झाली आहे.
रविवारी सकाळ पासूनच हवेत प्रचंड उकाडा होता. दुपारी अचानक ढग दाटून आले व तालुक्यातील शिऊर, सावरगाव, कुसडगाव, झिक्री, देवदैठण, नाहुली, पाडळी, धोंडपारगाव, जवळा, पिंपळगाव उंडा या सह अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला शिऊर येथे गारपिट झाली. तर नाहुली येथील राजेंद्र दशरथ जाधव हे जवळ वीज पडल्याने चांगलेच भाजले त्यांना ताबडतोब जामखेड येथील दवाखान्यात आणले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शिऊर जवळीक बसरवाडी येथील हरीभाऊ कडू यांच्या पाच शेळ्या गारपिटीने झोडपल्याने मेल्या. वसंत सुर्वे व अशोक सुळसकर यांच्या घरांची पडझड झाली. जवळा येथील गोयकरवाडी येथे विजेचा खांब उन्मळून पडला तर राजेवाडी येथे दत्तू राजाराम कुमटकर यांच्या घरावरील पत्रे उडाले.
सकाळपासून हवेत प्रचंड उकाडा होता दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु झाल्याने एकच हाहाकार उडाला अनेक ठिकाणी शेतात पाणी साचले होते तर काही ठिकाणी गारांचा सडा पडलेला होता.
तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी तातडीने नुकसान ग्रस्त भागात जाऊन पाहणी केली व शेतकर्यांना दिलासा दिला व ताबडतोब पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

0 टिप्पण्या