कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी धावून येत आहे वर्दीतील देवदूत महेंद्र अहिरराव

           जळगाव पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र अहिरराव

जळगाव प्रतिनिधी - जितेंद्र चौधरी 

कोरोना च्या पाश्वभूमीवर अनेक समाजसेवी संघटना तसेच शाशकीय यंत्रणा आप आपल्या परीने मदत करीत आहेत. परंतु आपल्या गावाच्या आणि शहराच्या माणसासाठी मूळ जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील रहिवासी आणि जळगाव येथे एस पी ऑफिस मध्ये कार्यरत असलेले पोलिस काँस्टेबल महेंद्र अहिरराव जिल्हा रुग्णालयातील कोविड हॉस्पिलमध्ये दाखल असलेल्या अमळनेरातील रुग्णांच्या मदतीसाठी धावून जात आहेत. म्हणूनच या वर्दीतील देवमाणसाच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
 कोरोना महामारीमुळे अमळनेर शहारातील व तांबेपुरा सानेनगर न्यू प्लॉट परिसरातील रुग्ण जळगाव येथील कोविड रुग्णालयात दाखल आहे. त्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होत असल्यास महेंद्र अहिरराव यांना कॉल केला तर ते स्वतः जिवाची व परिवाराची पर्वा न कर्ता कोरोनाग्रस्थ नातेवाईकांची अडचण सोडवण्यासाठी कोविड रुग्णालयात जातात. तेथे डॉक्टरांशी बोलून उपचार तसेच दाखल रुग्णांच्या जेवनाची सोय आणि अंत्यविधीसाठी येणाऱ्या अडचणीही सोडवत आहेत. यासाठी ते लाकडाची व बोळाणचीही सोय करून देत आहेत. ऐवढेच नव्हेत तर सॅनिटायझर , पिपीए कीटही उपलब्ध करून देत आहेत. या वर्दीतील देवमानसाला तांबापुरा परिसरातून अभिमानाने सॅल्यूट केला जात आहे.       ।                             ।।  पोलीस प्रवाह न्युज

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या