पोटाचा घेर कमी करण्यासाठी घरगुती उपाय.!



    पोटाचा वाढता घेर हि समस्या आजकाल सगळ्याच लोकांमध्ये बघायला मिळते, आणि हि समस्या नक्कीच गंभीर आहे. शिवाय पोटाच्या घेरामुळे अपचन, पित्त यासारख्या समस्या व्हायला सुरुवात होते. आणि ह्या सगळ्या समस्यांपासून जर दूर राहायचे असेल तर वजन कमी करणे या शिवाय दुसरा पर्याय नसतो. घरीच काही उपाय करून पोटाचा घेर कमी करता येतो.

 १) ग्रीन टी : हा चहा प्यायल्याने तुमचे मेटाबोलिसम चांगले होऊन वजन कमी होण्यास मदत होते, अँटी ऑक्सिडंट्स मुळे शरीरातील जास्तीचे फॅट बर्न होतात.  म्हणूनच रोज दोन कप ग्रीन टी घेणे शरीरास फायदेशीर ठरतो.

 २) ) ओट्स : ह्यात फायबर असल्याने तुम्हाला लवकर भूक लागत नाही आणि तसेच फायबरमुळे शरीरातील साखरेचे प्रमाण सुद्धा नियंत्रित राहण्यास मदत होते.  आपल्या सकाळच्या न्याहारी मध्ये ओट्स सोबत थोडे दूध आणि सुका मेवा देखील खावा.

 ३) बदाम :  बदामामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन इ, कॅल्शिअम, पोटॅशिअम  सोबतच प्रोटीन आणि फायबर देखील असतात. बदाम नुसतेच तुमचे वजन कमी करण्यास मदत करत नाही तर सोबतच कोलेस्ट्रॉल ची पातळीसुद्धा नियंत्रित ठेवतो.

४)  गरम पाणी: पहाटे रिकाम्या पोटी गरम पाणी पिणे फायदेशीर ठरेल. याने कॅलरीज कमी होतील. याव्यतिरिक्त जर आपण गरम पाण्यात लिंबू आणि मध टाकून प्यायला तर आणखीच चांगले परिणाम बघायला मिळतील.

५) कडधान्य :  जर कमी कॅलरीचे सेवन करायचे असेल तर कडधान्य नक्की खावे. यातून जास्तीत जास्त प्रोटीन शरीरात जातात तसेच व्हिटॅमिन बी, कॅल्शियम पोटॅशिअम सुद्धा शरीरात उत्तम प्रमाणात जातात.
                          पोलीस प्रवाह न्यूज.
#Healthtips #Bellyfats #Policepravahnews

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या