माणगांवमधील सणसवाडीतील एकाचा खून 

पोलीस प्रवाह न्यूज 

माणगांव-दि. १९- माणगांव तालुक्यातील विळे विभागातील मौजे सणसवाडीतील एकाचा खून झाल्याची घटना घडली आहे. 

पोलीस सूत्रांकडून मिळलेल्या माहितीनुसार सविस्तरपणे असे की, दि. १८ जानेवारी रोजी ७ ते ८.३० वा. च्या दरम्यान मौजे विळे आदिवासीवाडी गावच्या हद्दीत विळे हायस्कूलमधील शेतामध्ये सदरील घटना घडली. दि. १७ जानेवारी रोजी रात्री मयत सयाजी धोंडू पवार, रा. सणसवाडी व आरोपी मुकेश पुतलाजी नलावडे, गणेश बाबुराव नलावडे दोन्ही रा. सणसवाडी हे शेकोटी शेकत असताना त्यांच्यात झालेल्या भांडणाचा राग मनात धरून दि. १८ जानेवारी रोजी मयत व आरोपी हे विळे आदिवासीवाडी येथून दारू पिऊन घरी जात असताना विळे हायस्कुल समोरील शेतामध्ये आल्यावेळी मयत पवार यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने आरोपी मुकेश नलावडे व गणेश नलावडे यांनी संगनमत करून हाताबूक्याने व कोणत्यातरी हत्याराने जखमी केले. झालेल्या मारहाणीमुळे सयाजी पवार यांचा मृत्यू झाला.

  या घटनेची नोंद माणगांव पोलीस ठाण्यात कॉ. गु. र. नं. १०/२०२३ भा. दं. वि. सं. क. ३०२, ३४ प्रमाणे करण्यात आली असून पुढील तपास पो. नि. राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स. पो. नि. लहांगे करीत आहेत.