माणगाव रेपोली गावच्या हद्दीत भीषण अपघातत ९ जागीच ठार तर १ चिमुकला जखमी.
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव - दि. १९ - माणगाव तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. लोणेरे विभागातील रेपोली गावच्या हद्दीत दि. १९ जानेवारीच्या रात्री ३ ते ३:३० वाजण्याच्या सुमारास मन हेलावून करून टाकणारा विचित्र अपघात घडला आहे हा अपघात इको कार आणि ट्रक यांच्यामध्ये झाला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार असे समजते आहे की, महाड बाजूकडून मुंबई बाजूकडे जाणारा ट्रक क्रमांक एम एच ४३ यु ७११९ व मुंबई बाजूकडून गुहागर निघालेली इको कार क्रमांक एम एच ४८ बी टी८६७३ यांच्यामध्ये झालेल्या भीषण अपघातात ९ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे राहणार मु. पो. हेदवी गुहागरचे रहिवाशी असलेले पाच पुरुष व चार महिला मयत झाले आहेत तर एक लहान मुलगा गंभीर जखमी आहे. मात्र देवाची लीला अगाध आहे या भीषण अपघातात सुमारे ३ ते ४ वर्षाचा चिमुकला बालक जखमी होऊन वाचला आहे.
इको कार मधून प्रवास करणारे व मृत झालेले ९ जण हे मुंबई मालाड येथून गुहागर तालुक्यातील हेदवी कडे प्रवास करत होते अशी माहिती समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळताच गोरेगाव पोलीस ठाण्याचे पो. नि. श्रीकृष्ण नावले आपल्या संपूर्ण टीमसह घटनास्थळी दाखल झाले व रुग्णवाहिकेच्या साहाय्याने मृतांना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. तसेच जखमी चिमुकल्याला पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले आहे. सदर अपघाताचा पुढील तपास गोरेगाव पोलीस करत आहेत.



0 टिप्पण्या