रायगड पोलीस प्रवाह न्यूज़

माणगांव पाेलीस ठाणे येथे पाेलीस प्रवाह न्यूज़ महाराष्ट्र राज्य संपादक नवनाथ कापले यांच्या मार्गदर्शनाखाली माणगांव तालुक्यातील पाेलीसांच्या पाल्यांच्या ज्यांनी 10 वी 12 वी मध्ये विषेश गुणवत्ता प्राप्त केलेल्या पाेलीस पाल्यांचा सत्कार  दिं 5 सप्टें राेजी माणगांव पाेलीस ठाण्याचे पाेलीस निरीक्षक रामदास इंगवले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला महाराष्ट्रातुन एकुण 21 पाेलीस पाल्यांची निवड करण्यात आली हाेती. त्यापैकी चार विद्यार्थी हे माणगांव तालुक्यातील निवडण्यात आले या वेळी गाैरवाच्या गाेष्टीचे पाेलीस पालक व पाेलीस निरीक्षक यांनी मत व्यक्त केले.

या कार्यक्रमामध्ये सहाय्यक पाेलीस निरीक्षक उद्धव सुर्वे हे देखील उपस्थित हाेते. सत्कारमुर्ती पाेलीस पाल्यांमध्ये पाेलीस निरीक्षक इंगवले यांची कन्या आश्लेषा रामदास इंगवले (बारावी सायन्स 86.46), माणगांव वाहतुक पाेलीस शाखेचे विशाल येलवे यांची कन्या संस्क्रुती विशाल येलवे (10वी 92% ) महीला पाेलीस सानप यांची कन्या संस्क्रुती संताेष सानप (10वी 91.80%)  माणगांव बीट मार्शल पाेलीस विनायक चांदाेरकर यांचा पुत्र निखील चांदाेरकर (10वी 86.60%).


या सर्व गुणवंत विद्यार्थी याांचा सत्कार पाेलीस प्रवाह कडुन सन्मानपत्र ,फाईल फाेल्डर,व शालाेपयाेगी साहीत्य देऊन गाैरविण्यात आले यावेळी माणगांवचे पत्रकार व व्यंगचित्रकार रविंद्र कुवेसकर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले, पाेलीस प्रवाहचे वृत्तसंपादक परेश शिंदे ,जिल्हा प्रतिनिधी वैभव  सत्वे, निरंजन कळस , ऐ एम न्युज चँनल चे तालुका प्रतिनिधी सुनिल राजभर, सागर रातवडकर, न्युज 24 मराठी वेब न्युज चे काेकण विभाग संपादक  प्रमाेद जाधव या पत्रकारांची उपस्थिती हाेती कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जेष्ठ पत्रकार अरुण पाेवार यांनी केले. पाेलीस प्रवाह च्या स्तुत्य उपक्रमाचे माणगांव तालुक्यातुन सर्वत्र काैतुक हाेत आहे.