गिरीश गोरेगावकर,प्रतिनिधी
गोरेगाव : दि १५ - आतापर्यंत सुरक्षित राहीलेल्या माणगाव तालुक्यातील गोरेगाव विभागात पहीला कोरोना पाॅझिटिव्ह रूग्ण सापडल्याने खळबळ निर्माण झाली आहे.विशेष म्हणजे ही व्यक्ती मुंबई येथून नुकतीच आपल्या गावी आली होती.कोरोना लागण झाल्याचे तपासणी अंती सिध्द झाल्या नंतर आता प्रशासन आता आणखी माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत आहे.
12 मे रोजी गोरेगाव शहरा पासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या कुशेडे या गावात काही तरूण मुंबई येथून आले होते पैकी एक 22 वर्षीय तरुणाला ताप असल्याने माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यानंतर लगेचच पनवेल येथील कोवीड रूग्णालयात पाठविण्यात आले. तपासणी अंती या तरूणाला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने आता कुशेडे सह गोरेगावकरांची झोप उडाली आहे.
माणगाव तहसीलदार प्रियांका अहीरे यांच्या सह गोरेगाव पोलीसांनी गावात भेट देऊन पहाणी करत अधिक सखोल चौकशी सुरू केली आहे. संबंधीत रूग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध सुरू असून त्यांना होम क्वाॅरंटाईन करणे तसेच आवश्यक असलेल्या तपासणी करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात करण्यात आली आहे.
पोलीस प्रवाह न्यूज
#covid19 #coronavirus #lockdown #raigad #Goregaon#Maharashtranews

0 टिप्पण्या