रविंद्र कुवेसकर, प्रतिनीधी

माणगाव: दि २९ - कोरोना विरुद्ध लढ्यात आरोग्य सेवेतील डाॅक्टर्स, नर्सेस तसेच आता तर राज्याच्या ग्रामीण भागातून स्वच्छता सेवक, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, तलाठी, पोलीसपाटील, शिक्षक आणि नगरपंचायत, ग्रामपंचायत अत्यावश्यक सेवेतील सर्वच कर्मचारी लढा देत आहेत. यांना सर्व प्रकारचे आरोग्य रक्षक किट, कवचकुंडल पूरविणे ही अत्यंत महत्वाची बाब असून या कडे शासनाने तातडीने लक्ष घालून ही आयुधं, प्रत्यक्ष रणभूमीवर काम करणाऱ्या या सर्व कोव्हिड योद्ध्यांना देणे गरजेचे आहे. या अचानक आलेल्या महाभयंकर कोरोना संकटाने जग हादरले असताना, आपले पोलीस व प्रशासकिय कर्मचारी, अधिकारीवर्ग हे शासनाच्या अर्थात पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्या एका आदेशाने नियमांचे, कायद्याचे अंमल बजावणीसाठी तातडीने कार्यरत झाले होते. त्यावेळी केवळ तोंडाला मास्क लावून, सोशल डिस्टन्सिंग व  केवळ सॅनिटायजेशन या सूरक्षा आचार संहितेचे पालन करुन  स्वतःचे वापरातील सरकारी अथवा खाजगी पोशाखातच आजपर्यंत  काम करीत आहेत.

या सर्व कर्मचाऱ्यांसह पोलीस दलही तणावाखाली काम करत आहे. स्वतःच्या घराचा, आयुष्याचा विचार न करता ही माणसं रस्त्यावर कर्तव्य बजावत आहेत. त्यातच नुकतेच मुंबईत दोन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आता काही डाॅक्टरांनाही कोरोना लागण झाल्याची वृत्त ऐकू येत आहेत. या पार्श्वभूमीवर  काही जाणकारांचे म्हणने अस आहे कि परदेशातील अमेरिका, ईटली, फ्रान्स, चिन सारख्या देशातील कोरोना फायटर्स ज्याप्रमाणे सुरक्षा आयुधांचा वापर करताना दिसत आहेत. आपल्याकडे आपणही त्याप्रमाणे काळजी घेतली पाहीजे. याची शासनाने दखल घ्यावी. अशी ग्रामीण भागातील या कोरोना योद्ध्यांची भावना व्यक्त होत आहे.

सरकारच्या वतीनं या युध्दात कामी आलेल्या पोलीसांना आंदराजली अर्पण करताना त्यांच्या कुटुंबीयांसाठी सरकार जे जे शक्य असेल ते करेल पण, माणूस गेला आहे ! अशी खंत मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. सगळीकडे बाधीतांना, गोरगरीब गरजवंतांना अन्नधान्य रेशन, अत्यावश्यक मदत देण्याचे तसेच कोव्हिड19 रुग्णालय सज्ज करण्याचे प्रशंसनिय काम आपल्या राज्याच्या  मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाने  केंद्र व राज्य सरकार च्या माध्यमातून मोठ्या धैर्याने सक्षमतेने सफल होत आहेत. संकट मोठे आहे, यात थोडीशी चुकही होता कामानये; अस त्यांच म्हणने आहे.

कोणीही भुकेला राहता कामानये  अथवा औषधोपचारा- विना, मदतीविना वंचीत राहू नये. या साठी जोरदार प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे. खुप मोठी माणस, उद्योगपती, कलाकार, दानशूर सेवाभावी संस्था  मदत देताहेत. म्हणुनच या योद्ध्यांनाही जीवनरक्षक पोशाख, अत्यावश्यक  कवच कुंडल देण्यासाठी शासनाने लक्षवेधावे, अशी अपेक्षा आणि कळकळीची भावना व्यक्त होत आहे.  कारण ही काळजी आपण अग्रक्रमाने घेतली नाही तर कदाचीत ते धोकादायक ठरेल; अशी भिती व्यक्त होत आहे. कारण कोरोना संसर्ग आणि लक्षण यावर अजुनही खात्रीलायक माहीती व औषध या रोगावर उपलब्ध झाली नाहीत. असच अद्यापही बोलल जात आहे. त्यामुळे प्रीव्हेंशन ईज बेटर दॅन क्युअर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पुढील दुर्घटना टाळण्यासाठी पूर्व काळजी, खबरदारी घेणे  अत्यंत महत्वाचे आहे.

महाराष्ट्र सध्या करोनाच्या संकटाशी तोंड देत आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. तर राज्यात सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहे. तसेच राज्याच्या काही भागातही कोरोनामुळे परिस्थिती चिंता वाढवणारी आहे. लॉकडाऊनमुळे कोरोनाच्या प्रसाराचा वेग कमी झाला असला तरी, राज्याचं अर्थचक्र ठप्प झालं आहे. त्यामुळे ३ मे नंतर राज्य सरकार काय निर्णय घेणार याविषयी सगळ्यांच्या मनात प्रश्न आहेत. याच मुद्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अक्षयतृतीयेच्या दिवशी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधताना. राज्य पोलीस दलातील कोरोनामुळे मरण पावलेल्या पोलिसांविषयी शोक व्यक्त केला आहे.
                     
                          पोलीस प्रवाह न्यूज
#covid19 #coronavirus #lockdown #raigad #Mangaon#Maharashtranews