पोलीस प्रवाह न्यूज.
बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते इरफान खानचं वयाच्या 54 व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांची अचानक तब्येत बिघडल्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. इरफान खानला न्यूरोएंडोक्राइन ट्यूमरचा आजार होता. मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्याने अखेरचा श्वास घेतला आहे. अभिनेता इरफान खानने लंडनमध्ये कॅन्सरवर यशस्वी उपचार घेतले होते. त्यानंतर भारतात परल्यावर मंगळवारी अचनक त्याची प्रकृती खालावली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वी इरफानच्या आई सईदा बेगम यांचं जयपूरमध्ये निधन झालं होतं. मात्र लॉकडाऊनमुळे आणि प्रकृती ठीक नसल्याने इरफान जयपूरला जाऊ शकले नाहीत. इरफाननं त्यावेळी व्हिडीओ कॉलवरंच त्याच्या आईचं अंत्यदर्शन घेतलं होतं.
आज सकाळीच इरफानच्या प्रवक्त्याने कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले होते. मात्र यानंतर काहीच तासात इरफानच्या मृत्यूची बातमी आली.काही दिवसांपूर्वा इरफानची आई सईदा बेगम यांचे जयपूरमध्ये निधन झाले होते. मात्र लॉकडाऊन असल्यामुळे इरफानला जयपूरमध्ये पोहोचू शकला नव्हता. त्यानंतर काल इरफानची तब्येत बिघडली आणि त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले.
बॉलिवूड दिग्गज अभिनेता इरफान खान याची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपली. दीर्घकाळापासून कॅन्सरशी झुंज देत असलेल्या इरफानचे आज निधन झाले.काल अचानक तब्येत बिघडल्यामुळे इरफानला कोकिलाबेन रुग्णालयात आयसीयूमध्ये भरती करण्यात आले होते. इरफान लवकर बरा व्हावा, यासाठी चाहते प्रार्थना करत असताना त्याच्या मृत्यूची बातमी आली आणि चाहते शोकसागरात बुडाले. बॉलिवूडमध्येही शोककळा पसरली.
दोन वर्षांपूर्वी 2018 मध्ये इरफानने त्याच्या आजाराबद्दल आपल्या फॅन्सना सांगितले होते. इरफानला न्यूरो इंडोक्राइन ट्यूमर हा आजार होता. इरफानच्या आजारावर लंडनमध्ये उपचार सुरु होते. दीर्घकाळ उपचार घेतल्यानंतर सप्टेंबर 2019 मध्ये इरफान भारतात परतला होता. यानंतर त्याने ‘अंग्रेजी मीडियम’ या सिनेमाचे शूटींग सुुरू केले होते. नुकताच हा सिनेमा रिलीज झाला होता़ हा त्याचा शेवटचा चित्रपट ठरला.
पोलीस प्रवाह न्यूज
#irfankhan #bollywoodstar #passaway #Death #Mumbai

0 टिप्पण्या