प्रतिनिधी चिंचवड -

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर AICTE, DTE आणि महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई इ यांच्याकडून आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार रसिकलाल एम धारिवाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या तंत्रनिकेतनमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा अवलंब केला आहे. सध्या कोरोनाव्हायरस ने जगभर थैमान घातले असून या विषाणूपासून बचावासाठी सर्व स्तरातून प्रयत्न केले जात असतानाच धारिवाल कॉलेज कडून देखील ऑनलाइन शैक्षणिक उपक्रम अमलात आणले जात आहेत. त्यामध्ये विशेष करून विद्यार्थ्यांच्या विषयानुसार व अभ्यासक्रमानुसार व्हिडीओ लेक्चर, स्व हस्तलिखित नोट्स , असाइनमेंट तसेच झूम कॉन्फरन्सिंग ॲप द्वारे विद्यार्थ्यांची थेट संवाद साधणे व त्यांच्या शंकांचे निरसन करणे या बाबींचा समावेश आहे. यासोबतच विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमानुसार असलेल्या प्रात्यक्षिकांचे व्हिडिओज पाठवून समजावून सांगण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांची घरबसल्या प्रत्येक युनिटची उजळणी व्हावी यासाठी प्रत्येक युनिटवर ऑनलाइन पद्धतीने युनिट टेस्ट आणि पूर्व परीक्षा सुद्धा घेण्यात येत आहेत. ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येत असलेल्या पूर्व परीक्षेला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना वेळोवेळी फोन करून स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घेण्याचे आवाहन देखील करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचे व्हाट्सअप ग्रुप बनवून त्यांना स्टडी मटेरियल पाठवले जात आहे तसेच विद्यार्थ्यांना अभ्यास पूरक असणाऱ्या फ्री शैक्षणिक कोर्सेस बद्दल देखील प्रोत्साहित करण्यात येत आहे आणि सर्वात महत्वाचे ऑनलाइन पद्धतीने पालक मेळावा घेण्याचे सुद्धा सध्या विचाराधीन आहे. यासोबतच तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक जनजागृती साठी या कोरोना विषाणूचा सामना कसा करावा यासंदर्भात काही फोटोज व व्हिडिओज बनविले आहेत तेसुद्धा तंत्रनिकेतनच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत.
रसिकलाल एम धारिवाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तंत्रनिकेतन मधील विद्यार्थ्यांचे दिनांक 18 मार्चपासून वर्ग बंद करण्यात आले, त्यामुळे पुढे दिनांक 20 मार्च पासून या शैक्षणिक प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. लोक डाऊन मुळे विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना सुट्टी असली तरीदेखील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी तंत्रनिकेतन सतत प्रयत्नशील आहे. तसेच प्राध्यापक देखील वेगवेगळ्या ऑनलाईन फॅकल्टी प्रोग्राम्स मध्ये सहभागी होत आहेत.
श्री जैन विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय प्रकाश चंदजी धारीवाल साहेब, ओनररी जनरल सेक्रेटरी श्रीमान राजेंद्रकुमार जी मुथा, संस्थेचे प्राचार्य श्री अनिल थिटे आणि सर्व विभाग प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्राध्यापक ऑनलाईन शिक्षण प्रणालीचा अवलंब करत आहेत. तंत्रनिकेतन राबवलेल्या या ऑनलाइन शिक्षण प्रणालीचे विद्यार्थी आणि पालकांमधून कौतुक होत आहे.

✒प्रा. श्रीराम खडके
रासिकलाल एम. धारिवाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉंलॉजी, चिंचवड