श्रीक्षेत्र ओझर  प्रतिनिधी:-

पुण्यामधील मित्रांना मदतीचे अवाहन..
सकाळीच श्री.विनायक मनसुख यांच्यामार्फत श्री दिपक काशिद
जिवनज्योत फाऊंडेशन जुन्नर यांचा फोन आला व जुन्नर तालुका मित्र मंडळ पुणेचे अध्यक्ष प्रभाकर ढोमसे यांनी त्वरीत आपल्या सहकाऱ्यांना फोन केला की
ओमकार वय १२ वर्षे .अपेक्षा वय ७ वर्षे ...मेजर थॕलीसीमिया आजाराने ग्रस्त असल्याने दर महिन्याला जुन्नरच्या पश्चिमेच्या  अतिदुर्गम घाटघर गावातुन पुणे येथे रक्त भरण्यासाठी येतात,..
नेहमी प्रमाणे बुधवारी ते आई आणि वयस्कर आजोंबांसोबत १०८ ॲंब्युलंस ने पुणे येथे आले..
डि.वाय पाटील हाॕस्पीटल मध्ये ॲडमीट होवून त्यांना रक्त भरण्यात आले....तीन दिवसानंतर त्यांना हाॕस्पीटल मधून डिस्चार्ज देण्यात आला...
 १०८ अँम्ब्युलन्स सेवा ही फक्त रुग्णांना हाॕस्पीटल मध्ये घेऊन जाण्यासाठी आहे....
कोरोना लाॕकडाऊन मुळे हाॕस्पीटल मधून डिस्चार्ज होऊनही हे कुटुंब हाॕस्पीटल बाहेर बसून होते.
जुन्नर तालुक्यात अतिदुर्गम भागात राहणाऱ्या या आदिवासी कुटुंबाला जुन्नरला येण्यासाठी कोणतीही व्यवस्था नव्हती.. म्हणुन पुणे पिंपरी चिंचवड येथे राहणाऱ्या आमच्या मित्र बांधवांनी जबाबदारी घेऊन जुन्नर तालुका मित्र मंडळाचे वतीने त्यांना पाठवण्याची व्यवस्था केली. या आवाहनास जुन्नर तालुका मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर ढोमसे व तसेच संघटक  मेडिकल व्यावसायिक दिपक सोनवणे व उद्योजक इंद्रजित पाटोळे यांनी त्वरित प्रतिसाद देत त्यांना या प्रतिकुल कोरोनाच्या काळातही त्यांच्या गावी पोहचविण्याचे आव्हान स्विकारले व त्यांना त्यांच्या गावी पोहचवले.या कामाबद्दल त्या मुलांचे आजोबा मुंढे यांनी त्यांना या अडचणीच्या काळात देवच भेटल्याची भावना व्यक्त केली.
जुन्नर तालुका मित्र मंडळ ही संस्था पुणे व पिंपरी चिंचवड या ठिकाणी जुन्नर तालुक्यातील नोकरी व्यवसायानिमित्त स्थायिक झालेल्या लोकांची संघटना असुन तालुक्यातुन येणाऱ्या पुणे पिंपरी चिंचवड भागात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश,नोकरीचेे प्रश्न व आरोग्यसंदर्भातल्या अडचणी सोडवण्यासाठी कार्यरत असणारी सामाजीक संघटना आहे.मागील दोन महिण्यांपुर्वी आंबे हातवीज जवळील पिंपरवाडी या ठिकाणी मज्जारज्जुच्या आजाराने ग्रस्त असणाऱ्या उषा डामसे या महिलेलाही रमेश खरमाळे यांचे आवाहनानुसार जुन्नर तालुका मित्र मंडळाच्या सदस्यांच्या मदतीने ५१००० रू ची मदत केली होती.अशाप्रकारे मागील १६ एप्रिल ला कोरोनाच्या पार्श्वभुमीवर रस्त्यावर कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना सोसायटी सुरक्षारक्षक व सफाईकामगारांना जुन्नर मित्र मंडळाचे समन्वयक आण्णासाहेब मटाले यांचे माध्यमातुन ७५० मास्कचे वाटप करण्यात आले.

✍️ श्री.राजेंद्रकुमार शेळके.
       नारायणगाव, पुणे .