पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या उपस्थितीत रुग्णवाहिकेचे उदघाटन

माणगांव पोलीस ठाणे येथे पार पडले उदघाटन


पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव-दि. १९-  रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत माणगांव पोलीस ठाणे येथे रविवार दि. १९ मार्च रोजी रुग्णवाहिकेचे उदघाटन पार पडले. 
शांती निवास ओल्ड एज होम यांच्या सौजन्याने देण्यात आलेली ही रुग्णवाहिका माणगांव पो. नि. राजेंद्र पाटील व माणगांव पोलीस तसेच माणगांव तालुक्यात कार्यरत असलेली साळुंखे रेस्क्यू टीम यांच्याकडे असणार आहे. यामुळे अपघात, पूर परिस्थिती, दरड ई. आपत्कालीन काळात तात्काळ घटनास्थळी पोचून या रुग्णवाहिके मार्फत साहाय्य करण्यास मदत होणार आहे. या रुग्णवाहिकेमध्ये आपत्कालीन काळात रेस्क्यूसाठी लागणारी सर्व साधनसामग्री व साहित्य उपलब्ध असणार आहे. त्यामुळे या रुग्णवाहिकेचा फायदा अनेक नागरिकांना होणार असल्याची माहिती रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.
यावेळी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या समवेत पो. नि. राजेंद्र पाटील, स. पो. नि. सतीश आस्वर, पो. उपनिरीक्षक कीर्तीकुमार गायकवाड, सुर्यकांत भोजकर, मगर,  पोलीस अधिकरी व कर्मचारी, माणगांव तालुका साळुंखे रेस्क्यू टीम अध्यक्ष रविंद्र मोरे व साळुंखे रेस्क्यू टीम सदस्य आदी उपस्थित होते.