निजामपूर येथे महिलेचा विनयभंग.

पोलीस प्रवाह न्यूज 

माणगांव दि. १५- माणगांव तालुक्यातील निजामपूर येथे महिलेचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तरपणे असे की,  दि. ९ डिसेंबर रोजी १०.१५ वा. फिर्यादी रा. निजामपुर,  यांचे घराचे पाठीमागे असलेले पडवितील बाथरुममध्ये अंघोळ करत असताना खिडकीतुन अचानक मोबाईलचा प्रकाश पडल्याचे पाहुन फिर्यादी यांनी वर पाहीले असता कोणीतरी काळा जरकीन व कानटोपी घातलेला व्यक्ती संशयित आरोपी क्र. १ हा त्याचे मोबाईल पकडुन फिर्यादी यांची अंघोळ करतानाची व्हिडीओ शुटींग करत असताना फिर्यादी यांना दिसला. त्यामुळे फिर्यादी यांचे मनामध्ये लज्जा उत्पन्न झाली.  त्यामुळे फिर्यादी यांनी त्यांचे पती बोलवले असता तो पळुन गेला आहे. तसेच सदर प्रकाराबाबत आरोपी क्र.२  रा.आम्रपाली नगर निजामपुर, ता. माणगांव, जि. रायगड  हिने  फिर्यादी हीला शिवीगाळी केली. तसेच  आरोपी क्र. ०३ रा.आम्रपाली नगर निजामपुर, ता. माणगांव  हिने  काठीने यांना फोडुन काढले पाहीजे अशी धमकी दिली.

याबाबत माणगाव पोलीस ठाणे येथे गु. र. नं.  ३५३/२०२२ भा. दं. वि. क. ३५४ सी, ५०४, ५०६, ३४, माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० (२००८ चे सुधारणेसह) ६६ ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास  पो. नि. राजेंद्र  पाटील हे करीत आहेत.