रायगड जिल्ह्यातील आर.बी.एस.के वाहन पथक वाऱ्यावर.
पोलीस प्रवाह न्यूज
रायगड: दि. १३ - रायगड जिल्ह्यात सर्व तालुक्यातील रुग्णालय येथे आर बी एस के अंतर्गत आरोग्य तपासणी करिता रायगड जिल्ह्यात ३० वाहने करारनाम्यावर सेवा देत आहेत.
ही वाहने तालुक्यातील सर्व शाळा, अंगणवाडी येथे जाऊन लहान मुलांचे आरोग्य तपासणी करण्यासाठी वापरण्यात येत आहेत. तरी आज कित्तेक दिवस या वाहन चालकांनी संप पुकारला असून जिल्ह्यातील आरोग्य तपासणी थांबली आहे. त्या मुळे बऱ्याच मुलांचे ऑपरेशन होण्यास दिरंगाई होत असल्याचा गंभीर प्रकार होत आहे. या कडे आरोग्य विभाग व समंधित ठेकेदार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे या वाहनचालकांनी सांगितले आहे.
रायगड जिल्ह्यात सर्व रुग्णालय येथे आर.बी.एस.के ला चालणाऱ्या गाड्या या महाराष्ट्र विकास ग्रुप संस्था नाशिक ही पुरवते. या लोकांच्या वाहनांचे गेले २ महिन्याचे वेतन दिले गेले नाही. या महाराष्ट्र विकास ग्रुप नाशिक ही संस्था गेले ३ वर्ष या वाहन चे बिल देण्यास नेहमीच हेळसांड करत आहे. कोरोना काळात देखील या वाहन धारक यांनी आपली सेवा प्रामाणिक पणे बजावली असून त्यांच्या वर ही अशी उपासमारी चि वेळ येत आहे या बाबत आरोग्य विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे. या संदर्भात शिवसमर्थ वाहतूक सेवाभावी संस्था रायगडकडून आ. महेंद्र दळवी, जिल्हा शल्यचिकित्सक अलिबाग, आयुक्त आरोग्य भवन यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात २ महिने वेतन न दिल्यामुळे आमच्यावर उपसमारीची वेळ आली आहे. तसेच गाड्यांना इंधन भरणे अवघड होत आहे. यामुळे वाहने चालविणे कठीण झाले आहे. ठेकेदारास वारंवार फोन करून सुद्धा लक्ष देत नाही. हा विषय जिल्हा शल्यचिकित्सक यांना सुद्धा माहीत आहे असे नमूद केलेले आहे. तरी या रखडलेल्या वेतनाबाबत आ. महेंद्र दळवी यांनी लक्ष घालून जिल्ह्यातील सर्व ३० वाहन धारकांना न्याय मिळवून द्यावा अशी विनंती करण्यात आली आहे.




0 टिप्पण्या