भारताचे अमृत महोत्सवी वर्ष साजरा करताना स्वातंत्र्य सेनानिंचा इतिहास कायम स्वरुपी आठवणीत ठेवणे आवश्यक-  आमदार अनिकेत तटकरे


पोलीस प्रवाह न्यूज 

म्हसळा-दि. १२- सामाजिक एकता ट्रस्ट आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने म्हसळा न्यू इंग्लिश स्कूल येथे भारत देशाचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्या कार्याची महती नव्या पिढीला अवगत होण्यासाठी प्रत्येक शाळा गृहात त्यांची फोटो प्रतिमा आणि नंदु गुरव लिखित पुस्तक वाटप आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते वाटप करण्याचे कार्यक्रम ट्रस्ट अध्यक्ष शाहिद उकये आणि राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी युवक संघटना अध्यक्ष शहानवाज उकये आणि त्यांचे सहकारी मंडळीने आयोजीत केला होता. जेष्ठ पत्रकार संजय खांबेटे यांचे अध्यक्षतेखालील संपन्न झालेल्या भव्य कार्यक्रमाला आमदार अनिकेत तटकरे यांनी स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. 

या वेळी त्यांनी मनोगत व्यक्त करताना भारताचे अमृत महोत्सवी वर्ष आपण सारे जण साजरा करीत असताना ज्या शुरवीरांनी आणि स्वातंत्रसेनानींमुळे आपण आज देशात मुक्त श्वास घेत आनंदी जीवन जगत आहोत त्या स्वातंत्र्य सेनानींचे आपणास कधीच विसर पडता कामा नये. त्यांचा पुर्व इतिहास कायम स्वरुपी तेवत राहील याची काळजी घेतली पाहिजे आणि त्यांचे स्मरण होण्यासाठी त्यांच्या जयंती कार्यक्रम नेहमीच साजरे व्हायला पाहिजे असे मत व्यक्त करताना आपण राजे छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आदी राष्ट्रिय पुरुषांच्या जयंती कार्यक्रम नेहमीच साजऱ्या करीत असतो. या राष्ट्रिय पुरुषांच्या बरोबरीने नव भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांचे देशाचे स्वातंत्र्य काळात आणि सवधर्म समभाव जोपासत त्यांनी शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांची सदैव आठवण होण्यासाठी त्यांच्या जिवनपटावर तितकासा साहित्य उपलब्ध नाही तो झाला पाहिजे असे सांगतानाच २००७ साली खासदार अमोल कोल्हे यांनी राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची आजच्या पिढीला प्रेरणा आणि माहिती मिळावी यासाठी मोठी मालिका तयार केली तशाच पद्धतीने अन्यजणांनी अनेक स्वातंत्र्य सेनानीच्या इतिहासाच्या मालिका व चित्रपट काढले आहेत तशीच मालिका मक्का मदिना सारख्या देशात जन्मलेल्या आणि आपल्या भारत मातेसाठी जिवन खर्ची केलेल्या मौलाना अबुल कलाम आझाद यांचे साहित्य नवीन पिढीला अवगत होण्यासाठी कार्यरत राहावे आणि अशाच प्रकारचे सर्वधर्म समभाव जोपासत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे अशा शुभेच्छा आमदार अनिकेत तटकरे यांनी आयोजकांना दिल्या.

कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण संजय खांबेटे, प्रास्ताविक आयोजक प्रा.महमद शेख सर यांनी केले. मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करताना न्यू इंग्लिश स्कूल चेअरमन समीर बनकर, प्रा.मुब्बशिर जमादार सर,प्राचार्य प्रकाश हाकेसर,जेष्ठ समाजसेवक भाई दफेदार,मुस्लिम समाजाचे अध्यक्ष नाझिम चोगले,राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यार्थी संघटना अध्यक्ष शाहनवाज उकये यांनी आपापले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आमदार अनिकेत तटकरे, कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय खांबेटे ,न्यू इंग्लिश स्कूल चेअरमन समीर बनकर, नगराध्यक्ष असहल कादिरी, प्राचार्य प्रकाश हाकेसर, जिप माजी सभापती बबन मनवे ,मुस्लीम समाज अध्यक्ष नाजिम चोगले, अंजुमन चेअरमन नासीर मिठागरे, भाई दफेदार, रियाज घराडे, तालुका प्रमुख सुरेश कुडेकर ,माजी उप सभापती रविंद्र लाड, अंकुश खडस, प्राचार्य मुब्बशिर जमादार सर, शाहिद उकये, सतिश शिगवण, शेख सर ,महीला अध्यक्षा शगुप्ता जहांगिर, नगरसेविका सरोज म्हशिलकर, नगर सेवक करण गायकवाड, सूहेब हळदे, डॉ.नसीम खान, योगेश करडे ,सरपंच चंदु पवार, अमित महामुनकर आदी मान्यवर मंडळी विध्यार्थी पालक शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.