प्रतिनिधी यवतमाळ -

28 / 04 / 2020 :-- यवतमाळ येथील रहिवासी असलेले पोलीस बॉईज " शाहेद सय्यद " यांची पोलीस बॉईज असोसिएशनच्या विदर्भ अध्यक्ष पदी फेरनिवड करण्यात आली आहे. सन 2016 पासून शाहेद सय्यद यांनी " पोलीस बॉईज असोसिएशनच्या " माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यातील पोलीस अधिकारी / पोलीस कर्मचारी / व त्यांचे कुटुंबीय यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांच्या समस्या सोडविल्या आहेत .....🙏 त्यामुळे त्यांची ही उल्लेखनीय कामगिरी पाहता .."  पोलीस बॉईज असोसिएशनचे " संस्थापक :- अध्यक्ष :- प्रमोद वाघमारे यांनी त्यांना विदर्भ अध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत .....🙏