प्रतिनिधी - पिंपरी चिंचवड

आज संपूर्ण विश्व् COVID-19 कोरोनाविरोधाच्या जिकारीरीने लढा देत आहे.
या अत्यंत महाभयंकर महामारीच्या संकटाशी लढण्यात आपला भारत देश सुरक्षितपणे नियमांचे पालन करून अत्यंत सावधपणे पावले उचलत आहे.
त्यासाठी केंद्र सरकार व महाराष्ट्र राज्य सरकार यांचे कडून नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश पोलीस बांधवाना देण्यात आले.
समाजाच्या हितासाठी या महाभयंकर रोगाच्या साथीचे संसर्ग वाढू नये व यामध्ये आपले सर्व साधारण नागरिक यांचा बळी जाऊ नये यासाठी पोलीस अधिकारी कर्मचारी अक्षरशः आपला जीव पणाला लावून संचार बंदी, जमाव बंदी अशा आदेशाचे पालन करीत आहेत.
कित्येक ठिकाणी वेळप्रसंगी पोलीस बांधवाना आपला प्राण सुद्धा गमवावा लागला.
असे असताना सोमवारी संध्याकाळी काळेवाडी पिंपरी चिंचवड येथे अतिक्रमण विभागात कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला काही दृष्ट प्रवृत्तीच्या नराधमांनी अत्यंत बेदमपणे मारहाण केली.
ह्या अत्यंत निंदनीय घटनेचा फक्त पिंपरी चिंचवड शहरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र निषेध करीत आहे.
वरील निंदनीय घटनेचा संपूर्ण महाराष्ट्र भर प्रांत पोलीस मित्र संघांचे पदाधिकारी व सभासदांनी निषेध नोंदवला.
वरील घटनेच्या गुन्हेगारानां अत्यंत कठोर शिक्षा ही झालीच पाहीजे कारण असले भ्याड कृत्य करणार्यांना पोलिसी खाक्या दाखवून  जरब हा बसलाच पाहिजे.
समाज हितासाठी व समाज रक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या कर्तव्य तत्पर पोलिसांवर हात उचलन्याची समाजकंटकांची हिम्मत होणार नाही.
आम्ही प्रांत पोलीस मित्र संघांचे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील पदाधिकारी व सभासद जाहिर निषेध नोंदवित आहोत.

गोपाल बिरारी राष्ट्रीय अध्यक्ष
प्रांत पोलीस मित्र संघ
संस्थापक मा राजेशजी भोसले. प्रांत पोलीस मित्र संघ