नारायणगाव प्रतिनिधी -  राजेंद्रकुमार शेळके.


जसे कुठल्याही संकटाच्या वेळी तसेच शासनाच्या कुठल्याही आरोग्यविषयक कार्यक्रमांमध्ये निमा समरसून काम करते आणि अशा समरसून काम करणाऱ्या आणि निरपेक्षपणाने  सामाजिक काम करणार्‍या निमा संघटनेला अनेक संघटनांची देखील वेळोवेळी मदत होत असते. यावेळेस देखील फॅमिली फिजिशियन म्हणून तसेच काही हॉस्पिटलच्या माध्यमातून निमा संघटनेचे सदस्य स्वतः पेशंटचा येणारा पहिला संपर्क असून देखील जोखीम घेऊन आपापल्या दवाखान्यात काम करीतच आहेत. आभाळच फाटलं आहे त्यामुळे कुठे कुठे मदत मिळणार ,अशी परिस्थिती असताना संरक्षक साधने नसली तरीदेखील आपले सदस्य काम करीत आहे ही अभिमानास्पद गोष्ट आहे. अशावेळी अशा मदत करणाऱ्या अनेक संघटनांनी पैकी अग्रभागी असणार्‍या *राष्ट्रवादी डॉक्टर सेल* या संघटनेने निमा संघटनेला फेस शील्ड देऊ केले आहेत. तसेच आपली मास्क बद्दलची व पुढच्या संरक्षक साधनांची सरकार दरबारी असणारी मागणी त्यांच्याकडे देखील पोहोचली आहे. मास्क पुढच्या टप्प्यात येतील असेही राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे कडून सांगण्यात आले आहे. संघटनेच्या अनेक सदस्यांनी फेस शील्ड घेतलेले आहेत काहींकडे आहेत परंतु एकंदरीत आजाराचा प्रसार आणि कालावधी बघता अजून फेस शील्ड ची गरज भासणारच आहे. कमी पडल्यास ते पुरवण्या बद्दल राष्ट्रवादी डॉक्टर सेल ने आश्वासन दिले आहे. आता सध्या 250 फेस शील्ड आलेले आहेत.
डॉक्टर.दत्तात्रय कोकाटे, सांगवी डॉक्टर प्रज्ञा खोसे ,हिंजवडी
डॉक्टर. नंदकुमार  माळशिरस कर ,भोसरी
डॉक्टर .अभय तांबिले, चिंचवड स्टेशन या चार ठिकाणी फेस शील्ड उपलब्ध होणार आहेत *(साधारणपणे उद्या किंवा परवापासून सदर ठिकाणी फेस शील्ड उपलब्ध करून दिले जातील तसा मेसेज ग्रुप वर टाकण्यात येईल तसेच त्या-त्या एरियातील उपलब्धता संपली की तसा मेसेज पण नंतर ग्रुप वर टाकण्यात येईल व फेस शील्ड मागवण्यात येतील)* तरी मेसेज आल्यानंतर त्या-त्या व जवळ असणाऱ्या एरियातील निमा सदस्यांनी सदर ठिकाणी जाऊन आपले फेस शील्ड कलेक्ट करावे. याकामी राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे
डॉक्टर विजय चौधरी,अध्यक्ष, राष्ट्रवादी डॉक्टर सेल ,पिंपरी चिंचवड डॉक्टर संदीप सांडभोर
डॉक्टर संचित लंघे
तसेच इतर सदस्य यांची मोलाची मदत झाली. विशेष म्हणजे सदर फेस शील्ड  राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे वरील डॉक्टर *कार्यकर्त्यांनी  आकुर्डी येथील  अध्यक्ष डॉक्टर. सत्यजीत पाटील सर, पंच तारानगर ,आकुर्डी*  यांच्या दवाखान्यात  पोहोचती केली आहेत  त्याबद्दल त्यांचे विशेष आभार. सदर फेस शील्ड घेताना अध्यक्षांसोबतच निमा सदस्य डॉक्टर सूर्यकांत भोईटे व सेक्रेटरी अभय तांबिले हे देखील हजर होते. निमा पिंपरी चिंचवड शाखा ही मनापासून *राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय, अध्यक्ष मा.शरदचंद्रजी पवार साहेब*
व राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे मनापासून आभार व्यक्त करते.